Nagpur Crime : नागपूरला झालंय तरी काय? सारख्याच होतायत हत्या!

नागपूर शहरात हत्या सत्र सुरूच असून ते थांबण्याच नाव घेत नाही. सदर परिसरात केवळ घरगुती कारणावरून मामा ने भाच्याची हत्या केली आहे.
Nagpur Crime : नागपूरला झालंय तरी काय? सारख्याच होतायत हत्या!
Nagpur Crime : नागपूरला झालंय तरी काय? सारख्याच होतायत हत्या!SaamTvNews

मंगेश मोहिते

नागपूर : नागपूर शहरात हत्या सत्र सुरूच असून ते थांबण्याच नाव घेत नाही. सदर परिसरात साध्या घरगुती कारणावरून मामा ने भाच्याची हत्या केली त्यामुळे नागपुरात चाललं तरी काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. दिवसेंदिवस नागपुरातील गुन्हेगारी वाढली असल्याचे दिसून येत आहे.

हे देखील पहा :

नागपूर शहरात हत्या सत्र सुरूच असून क्षुल्लक कारणावरून हत्या होत आहेत. त्यामुळे नागपुरात चाललं तरी काय असे प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहेत. मामा आणि भाचा दोघेही सदर पोलीस स्टेशन हद्दीत राहतात एकाच वस्तीत राहायचे. रात्री, आरोपी दिनेश लोखंडे याचा पत्नी सोबत झगडा झाला त्यावेळी आरोपी चा मुलगा आणि मृतक अतुल उईके म्हणजेच आरोपीच्या भाच्याला बोलवायला गेला.

Nagpur Crime : नागपूरला झालंय तरी काय? सारख्याच होतायत हत्या!
Buldhana : आरोग्य विभागात 30 नवीन ॲम्बुलन्स रुग्णसेवेसाठी दाखल

अतुल जेव्हा घरी आला तेव्हा आरोपी दिनेश घरी नव्हता. मात्र, दोघांनी मिळून त्याचा शोध घेतला. तो मिळाल्या नंतर आरोपीने यांच्या सोबत झगडा केला आणि झगड्यात मामा दिनेश ने भाचा अतुल वर लोखंडी रॉड ने हल्ला केला त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. आरोपी घटनास्थळी पासून फरार झाला पोलीसना माहिती पोलीस मिळताच घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपीला रात्रीच अटक केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com