Crime : नागपूर शहरात गुंडांचा हैदोस; हातात शस्त्रे घेऊन माजवली दहशत!

आरोपींनी ऑफिसमध्ये आणि पेट्रोल पंपावरती चाकूचा धाक दाखवून पैसे लुटण्याचा प्रयत्न केला असल्याचे देखील समोर आले आहे.
Crime : नागपूर शहरात गुंडांचा हैदोस; हातात शस्त्रे घेऊन माजवली दहशत!
Crime : नागपूर शहरात गुंडांचा हैदोस; हातात शस्त्रे घेऊन माजवली दहशत!मंगेश मोहिते

मंगेश मोहिते

नागपूर : नागपूरच्या मानेवाडा परिसरात दोन आरोपींनी हातात चाकू घेऊन धुडगूस घातल्याचा CCTV फुटेज समोर आला आहे. सविस्तर घटना अशी, शहरातील मानेवाडा परिसरात सायंकाळी सहाच्या सुमारास, दोन आरोपी दुचाकीवर फिरून लोकांना लुटण्याचा प्रयत्न करत होते. मानेवाडा मेन रोड वरती दुचाकी थांबवून दुचाकीवर पाठीमागे बसलेला गुंड लोकांना चाकूचा धाक दाखवत त्यांच्या मागे पळताना या CCTV फुटेजमध्ये दिसत आहे.

हे देखील पहा :

सदर आरोपी अशाच प्रकारे दोन ते तीन नागरिकांच्या मागे चाकू घेऊन धावला. तेव्हा हे नागरिक जीवाच्या आकांताने धावत सुटले व पटकन घराचा दरवाजा त्यांनी बंद करून घेतला. परंतु हा नराधम या तीन जणांच्या मागे धावत जाऊन घराच्या दारावर लाथ मारून, खिडकीची काच फोडताना CCTV मध्ये कैद झाला आहे.

Crime : नागपूर शहरात गुंडांचा हैदोस; हातात शस्त्रे घेऊन माजवली दहशत!
Breaking Sangli : सावकारी करणे पितापुत्राला पडले महागात!

दोन्ही आरोपींनी मानेवाडा परिसरामध्ये लोकांना लुटण्याचा प्रयत्न करून, तिथून पळत असताना दिघोरी रोडवर पोलिसांनी या आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी ऑफिसमध्ये आणि पेट्रोल पंपावरती चाकूचा धाक दाखवून पैसे लुटण्याचा प्रयत्न केला असल्याचे देखील समोर आले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com