Viral Video : चंद्राच्या गाण्यावर चक्क तरुणाने लगावले हटके ठुमके; नागपूरमधील तरुणाच्या डान्सपुढे तरुणीही पडतील फिक्या

तरुणाच्या हटके ठुमक्याचे नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे
Nagpur Dancer Viral Video
Nagpur Dancer Viral VideoSaam tv

Nagpur Dancer Viral Video : 'चंद्रमुखी' सिनेमातील चंद्राच्या गाण्याची भुरळ अद्याप कायम आहे. आजही सोशल मीडियावर चंद्राच्या गाण्यावरील नाचणाऱ्या तरुणींचे व्हिडिओ व्हायरल होतात. याचदरम्यान, नागपूरमधील एका तरुणाचा चंद्राच्या गाण्यावरील डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर झाला आहे. तरुणाच्या हटके ठुमक्याचे नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे. (Latest Marathi News)

चंद्रा गाण्याने सर्वांवरच आपली छाप सोडली आहे. अगदी मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांनाच वेड लावले आहे. सर्वच जण या गाण्यावर एकदा तरी थिरकल्याशिवाय राहत नाही. सोशल मीडियावर आतापर्यंत अनेक तरुणींचा या गाण्यावरील डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. याचदरम्यान, एका मुलाचा या गाण्यावर ठुमके लगावतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.

Nagpur Dancer Viral Video
Viral Video : दारुच्या नशेत नवरदेव लग्नमंडपात पोहोचला; पुढे जे घडलं ते एकदा बघाच

डान्सर अनुज गायकवाड याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनुजचा डान्सचा व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर उपलब्ध आहे. अनुजचा हा व्हिडिओ आतापर्यंत एक लाखाहून अधिक जणांनी पाहिला आहे. अनुजच्या व्हिडिओला एक लाख, सत्तर हजारांहून अधिक जणांनी लाईक केला आहे. तर दोन हजाराहून अधिक जणांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हा व्हिडिओ पाहून एका युजरने म्हटले आहे की, 'एखाद्या लावण्यवतीलाही लाजवतील, असे तुझे हावभाव आहेत. खरंच खूप भारी डान्स केला. तर दुसऱ्या युजरने म्हटले की, 'चंद्राला पण फेल केलंस'.

कोण आहे अनुज गायकवाड ?

अनुज गायकवाड हा उत्कृष्ट डान्सर आहे. अनुजचा हा मूळचा नागपूरचा (Nagpur) आहे. अनुज हा मेकअप करण्यातही खूप तरबेज आहे. अनुज डान्सर आणि मेकअप आर्टिस्ट देखील आहे. अनुजचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. अनुजचे इन्स्टाग्रामवर अडतीस हजारांहून अधिक फॉलोवर्स आहेत.

Nagpur Dancer Viral Video
Viral Video : बापरे बाप! गायकाचं गाणं इतकं आवडलं की चाहत्यांनी पाडला पैशांचा पाऊस; पाहा व्हिडिओ

दरम्यान, चंद्रा गाण्याची कोरियोग्राफी फुलवा खामकर यांनी केली आहे. तर या गाणं हे गायक श्रेया घोषाल यांनी गायलं आहे. तर अभिनेत्री अमृता खानविलकर यांनी या गाण्यावर नृत्य केलं आहे. विश्वास पाटलांच्या कादंबरीवर आधारित चंद्रमुखी चित्रपट असून चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओकचे आहे. चित्रपट एक बडा राजकारणी आणि तमाशा कलावंतीन यांच्यावर बेतलेला आहे. एका बाजूला राजकीय आयुष्य आणि त्यातील संघर्ष तर दुसरीकडे बहरदार प्रेम याचा सुंदर मेळ चित्रपटात दिसतो.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com