रेशन धान्याच्या मापात 'कंची'; एका पोत्यात 2 ते 3 किलो कमी धान्य

नागपूर शहरात रेशवरील धान्याच्या प्रत्येक पोत्यात दोन ते तीन किलो वजन कमी येत आहेत.
रेशन धान्याच्या मापात 'कंची'; एका पोत्यात 2 ते 3 किलो कमी धान्य
रेशन धान्याच्या मापात 'कंची'; एका पोत्यात 2 ते 3 किलो कमी धान्यसंजय डाफ

नागपूर - पूर्व विदर्भातील रेशनवरील धान्य Grain घोटाळ्यात आता नवे आरोप लावण्यात आले आहे. रेशनवरील धान्यात कंत्राटदार कंची मारत असल्याची  माहिती पुढे आली आहे. नागपूर Nagpur शहरात रेशवरील धान्याच्या प्रत्येक पोत्यात दोन ते तीन किलो वजन कमी येत आहेत. असा गंभीर आरोप रेशन दुकानदार Shop संघटनेचे अध्यक्ष गुड्डू अग्रवाल Guddu Agrawal यांनी केला आहे.

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत रेशन कार्ड Ration Crad धारकांना दिली जाणारा तांदूळ हा निकृष्ट दर्जाचा असल्याची बातमी साम टिव्हीने दाखवली होती. या बातमीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे रेशन घोटाळ्याचं रॅकेट मोठं असून यात 1 हजार कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे खळबळ उडाली होती. आता या घोटाळ्यात नवा आरोप करण्यात आला आहे.

हे देखील पहा -

नागपूरात दर महिन्याला १ लाख ६० हजार क्विंटल धान्याचे वितरण केले जाते. प्रत्येक पोत्यात कंत्राटदार 2 ते 3 किलो धान्य कमी करतो. त्यामुळे नागपूरात दर महिन्याला ३ हजार २०० क्विंटल धान्य कमी वितरीत होत असून, यात दर महिन्याला ६५ लाख रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे.

रेशन धान्याच्या मापात 'कंची'; एका पोत्यात 2 ते 3 किलो कमी धान्य
राष्ट्रीय महामार्गावर साचलेल्या पाण्यात जहाज सोडून युवकांची अनोखी गांधीगिरी !

नागपूर शहरात धान्य वितरीत करणारे कंत्राटदार आणि अन्न पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा  घोटाळा होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. यावर अन्न पुरवठा विभागाचे अधिकारी काहीही बोलायला तयार नाहीत. त्यामुळे या घोटाळ्याची चौकशी करून गरिबांच्या हक्काचे धान्य लुटणाऱ्यांवर कारवाईची गरज आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com