नागपूर मध्यवर्ती कारागृहात गुन्हेगारात टोळीयुद्ध

या घटनेत ३ आरोपी जखमी
नागपूर मध्यवर्ती कारागृहात गुन्हेगारात टोळीयुद्ध
नागपूर मध्यवर्ती कारागृहात गुन्हेगारात टोळीयुद्धसंजय डाफ

नागपूर -  मध्यवर्ती कारागृहात सुरू असलेले टोळीयुद्ध काही केल्या थांबत नसल्याचे चित्र  दिसून येत आहे. गुन्हेगारांच्या दोन गटांनी ऐकमेकांवर हल्ला चढविला आहे. या घटनेत ३ आरोपी जखमी झाली असून कारागृह Jail प्रशासनाच्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी Dhantoli Police एका गटावर अदखलपात्र, तर दुसऱ्या गटाविरुद्ध हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या तीन आठवड्यांमध्ये कैद्यांमध्ये मारहाण होण्याची ही दुसरी घटना असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे कारागृह अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.अमीर पटेल हा खुनाच्या प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात तुरुंगात आहे.

हे देखील पहा -

प्रतिस्पर्धी गुन्हेगार शेख रिजवान शेख मुजीब, प्रज्वल विशाल शेंडे, संतोष अच्छेलाल गोंड यांनी अमीरवर हल्ला केला. या घटनेमुळे अमीर संतापला. त्यामुळे अमीरने चिडून सौरभ तायवाडे आणि मोनू समुंद्रे यांच्यासोबत लोखंडाच्या पट्टीने शेख रिजवानवर हल्ला केला. गालावर वार करून त्याला जखमी केले. या घटनेमुळे कारागृहात खळबळ उडाली. 

नागपूर मध्यवर्ती कारागृहात गुन्हेगारात टोळीयुद्ध
मुंबई एपीएमसी धान्य मार्केटमध्ये डाळीच्या दरात घसरण

तुरूंग रक्षकाने या घटनेबाबद धंतोली पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी मोनू व त्याच्या साथीदाराविरुद्ध गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान याआधी काही दिवसांपूर्वी कुख्यात गुंडाच्या टोळीतही कारागृहात हाणामारी झाली होती. यात कामठीतील एका कुख्यात गुंडाला गंभीर दुखापत झाल्याची चर्चा होती. मात्र हे वृत्त कारागृह प्रशासनाने फेटाळून लावले होते. गेल्या तीन आठवड्यांमध्ये कैद्यांमध्ये मारहाण होण्याची ही दुसरी घटना आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com