Nagpur News: संतापजनक! नागपूरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

नागपूर जिल्ह्यातील उमरेड मध्ये ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.
Crime news
Crime news saam tv

नागपूर: नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील उमरेड मध्ये ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलीवर गेल्या एक महिन्यांपासून अत्याचार सुरू होता, अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींना ताब्यात घेतले आहे.

Crime news
Sanjay Raut: महाराष्ट्रात पुन्हा सत्ता परिवर्तन? संजय राऊतांचे सूचक वक्तव्य

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रोशन कारगाकर आणि गजानन मुरस्कर या दोन मित्रांनी सुरुवातीला स्वतःच्या घरी नेऊन त्या मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर रोशन वेळोवेळी मुलीला घरी बोलवून अत्याचार करायचा. त्यानंतर प्रेमदास गाठीबांधे नावाच्या मित्राला माहीत झाल्यानंतर त्याने मुलीला धमकावून सहा मित्रांसह मुलीवर अत्याचार केला. एका खुनाच्या तपासादरम्यान हा प्रकार उघडकीस आल्यावर पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल करत नऊ आरोपींना अटक केली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com