नागपूरच्या लक्ष्मणचा सातासमुद्रापार डंका
नागपूरच्या लक्ष्मणचा सातासमुद्रापार डंकासंजय डाफ

नागपूरच्या लक्ष्मणचा सातासमुद्रापार डंका

जागतिक हस्ताक्षर स्पर्धेत कलात्मक प्रकारात जगातून प्रथम

नागपूर - आजच्या संगणकाच्या युगात लिहण्याची सवय कमी होत चालली आहे. असे असले तरी लिहण्याची आणि चागल्या हस्ताक्षराचे महत्व कमी होत नाही. जागतिक हस्ताक्षर स्पर्धेत Signature Contest नागपूरच्या तरुणाने सातासमुद्रापार डंका वाजविला आहे. या स्पर्धेत कलात्मक प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला आहे. लक्ष्मण बावनकुळे Lakshman Bawankule ३ वर्षांचे असतानाच आईवडील गेले. त्यांना माय-बापाचा चेहराही आठवत नाही. मामाने लहानचे मोठे केले अन् आजीने  जिव्हाळा लावला. आज या मामाच्या लेकराने अख्ख्या जगात डंका वाजवला आहे. राज्य नाही, देश नाहीतर संपूर्ण जगातून तो हस्ताक्षर स्पर्धेत पहिला आला आहे.

हे देखील पहा -

लक्ष्मण कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात कनिष्ठ अभियंता आहे. यंत्राच्या युगात आणि यंत्रात काम करत असताना त्यांनी हातचा पेन मात्र सोडला नाही. लहानपणापासून सुवाच्च अक्षरांमध्ये लिहिणं ही त्यांची आवड. याच आवडीने आज जगात त्यांना ओळख मिळवून दिली आहे.अमेरिकेतल्या आंतरराष्ट्रीय मुख्यालयाने जागतिक हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात कलात्मक हस्ताक्षर प्रकारात २०-६४ वयोगटात लक्ष्मण पहिला आला आहे. तो जिंकल्याचा मेल येताच सर्वांना आनंद झाला. डिजिटल युगातही लक्ष्मणने पेनची साथ सोडली नाही अन् आज भारताचं नाव जगाच्या पाठीवर चमकवलं आहे. त्यामुळे लक्ष्मण वर  कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com