नागपूरात यंदा कोरोनामुळे साध्या पद्धतीने मारबत उत्सव साजरा

नागपूरात 141 वर्षांची मारबत उत्सवाची परंपरा
नागपूरात यंदा कोरोनामुळे साध्या पद्धतीने मारबत उत्सव साजरा
नागपूरात यंदा कोरोनामुळे साध्या पद्धतीने मारबत उत्सव साजरासंजय डाफ

नागपूर - संपूर्ण देशात फक्त नागपूरातच Nagpur साजरा होणारा मारबत उत्सव यंदा कोरोनाच्या निर्बंधांमुळं सध्या पद्धतीनं साजरा केला जाणार आहे. पोळ्याच्या पाडव्याला साजरा होणाऱ्या या मारबत उत्सवाला 141 वर्षांची परंपरा आहे. काळी आणि पिवळी मारबतीची म्हणजे प्रतिकात्मक पुतळ्याची मिरवणूक काढून ती शहराच्या विविध भागातून काढली जाते. ही मिरवणूक बघण्यासाठी नागपूरकर मोठी गर्दी करतात.

हे देखील पहा -

नागपूरकर राजे भोसले यांच्या काळात त्यांच्या घराण्यातील बाकाबाई इंग्रजांना फितूर झाली होती. त्यामुळे भोसलेंचा पराभव झाला होता. तिच्या निषेधार्त काळी मारबत काढली जाते. तर समृद्धी राहावी यासाठी पिवळी मारबत काढली जाते. या मारबतीची नागरिक पूजा करतात, नवस बोलतात. मिरवणुकीनंतर दोन्ही मारबतीचे दहन केले जाते. यंदा मात्र कोरोनामुळे मारबत उत्सवावर निर्बंध घातले आहेत. देशात फक्त नागपूरमध्ये हा मारबत उत्सव साजरा केला जातो.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com