
Nagpur-Mumbai additional flight service of Air India: नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईला जाण्यासाठी आता नागपूरकरांना अतिरिक्त विमान सेवा सुरू करण्यात येणार आहे. एअर इंडियाने ही अतिरिक्त विमानसेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २० मेपासून एअर इंडियाची नागपूर-मुंबई अतिरिक्त विमानसेवा होणार सुरु होणार आहे.
ही नागपूर-मुंबई विमानसेवा २० मेपासून सुरू होणार असून २८ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील. एअर इंडियाचे एआय-१६१३ हे यासाठी सज्ज आहे. हे विमान २० मे रोजी सकाळी ११ वाजता मुंबईहून उड्डाण भरून नागपूरमध्ये दाखल होईल.
त्यानंतर हेच विमान एआय-१६१४ बनून पुन्हा नागपूर ते मुंबईसाठी उड्डाण करेल. हे विमान नागपूरमधून दुपारी १२:०५ वाजता मुंबईसाठी उड्डाण भरेल. एअर इंडिया कंपनीने नियमित विमानसेवेऐवजी अतिरिक्त उड्डाण भरण्याचा निर्णय घेतला आहे. (Latest Breaking News)
हे विमान २० मे ते २८ ऑक्टोबरपर्यंत उड्डाण भरेल, त्यानंतर ते नियमित केले जाण्याची शक्यता आहे. एअर इंडियाच्या या विमानामुळे अन्य विमान कंपन्यांच्या तिकीटदरात घसरण होण्याची शक्यता. त्यामुळे नागपूर - मुंबई असा विमानप्रवास करणाऱ्या प्रवाशांना एअर इंडियाच्या या सेवेमुळे मोठा दिलासा मिळून शकतो. (Latest Marathi News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.