नागपूर महानगरपालिकेत कोट्यावधींचा भ्रष्टाचार; भाजप नेत्यांनीच केला आरोप

नागपूर महानगरपालिकेत कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नागपूर महानगरपालिकेत कोट्यावधींचा भ्रष्टाचार; भाजप नेत्यांनीच केला आरोप
नागपूर महानगरपालिकेत कोट्यावधींचा भ्रष्टाचार; भाजप नेत्यांनीच केला आरोपSaam Tv

नागपूर: नागपूर महानगरपालिकेत (Nagpur Muncipal Corporation) कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ‘केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध १० योजना राबवण्यात झाला भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ‘योजनांवरील निधी खर्च झाला, मात्र सामान्यांना लाभ मिळाला नाही’ असे आरोपात म्हणण्यात आले आहे.

नागपूर महानगरपालिकेत कोट्यावधींचा भ्रष्टाचार; भाजप नेत्यांनीच केला आरोप
NEET Exam: बुलढाण्यातील परीक्षा केंद्रातील गैरप्रकार CCTVमध्ये कैद

भाजपचे प्रदेश सचिव आणि मनपा नगरसेवक धम्मपाल मेश्राम यांचा आरोप केले आहेत. नागपूर महानगरपालिकेवर सध्या भाजपची सत्ता आहे आणि आरोप हे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केले असल्यामुळे भाजपला घरचा आहेर मिळाला आहे. मनपा प्रशासनातील काही अधिकारी भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. चौकशीसाठी मनपाने पाच सदस्यीय समिती नेमल्याची माहिती देण्यात आली आहे. सत्ताधारी भाजपच्या नेत्याने आरोप केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com