Nagpur News: नागपूरकरांना पालिकेचा मोठा दणका, महिन्याभरात बेशिस्तांकडून लाखोंचा दंड वसूल

नागपूर महापालिकेने दंड वसुलीचा मोठा विक्रम नोंदवला आहे. एका महिन्यात तब्बल ३० लाखांचा दंड वसूल झाला आहे.
Nagpur News
Nagpur NewsSanjay daff

Nagpur News: बेशिस्त नागपूरकरांना वठणीवर आणण्याचा पवित्रा नागपूर (Nagpur) महापालिकेने हाती घेतला आहे. वारंवार सुचना देऊनही नागपूरकर रस्त्यांवर कचरा टाकतात आणि परिसर खराब करतात. अशात आता नागरिकांवर दंडात्मक कारवाईला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागपूरकरांच्या खिशाला चांगलीच कात्री बसलीये. पालिकेने ही दंडात्मक कारवाई सुरू केल्यापासून ५ हजाराहून जास्त नागरिकांकडून दंड वसूल करण्यात आला आहे.

Nagpur News
Nagpur MNS | नागपूरात मनसे कडून ‘हर हर महादेव’चा निःशुल्क शो | Har Har Mahadev

नागपूर महापालिकेने दंड वसुलीचा मोठा विक्रम नोंदवला आहे. एका महिन्यात तब्बल ३० लाखांचा दंड वसूल झाला आहे. स्वच्छतेच्या मानांकनात दिसत असलेली घसरण लक्षात घेता महापालिका आता ऍक्टीव मोडवर आहे. त्यामुळे अजूही न सुधारलेल्या नागपूरकरांनी वेळीच स्वच्छतेचे नियम पाळण्याची सवय लावून घ्या. त्याने तुमचा खिसाही सुरक्षित राहील आणि स्वच्छतेच्या नामांकनात नागपूर थोडे पुढे येईल.

Nagpur News
MSRTC Bus Fire : अमरावती-नागपूर महामार्गावर एसटी बस पेटली; 35 प्रवासी थोडक्यात बचावले

नागपूरात रस्त्यावर थुंकणारे, लघुशंका करणारे आणि कचरा(Garbage) टाकणाऱ्यांवर मनपाच्या उपद्रव पथकाकडून ही कारवाई करण्यात येत आहे. रस्त्यावर थुंकणे, कचरा टाकणे, अस्वच्छता ठेवणे याने शहराबरोबरच अनेक गोष्टींचे नुकसान होते. यात अनेकदा घाणीचे साम्राज्य वाढल्याने रोगराई देखील पसरते. त्यामुळे नागपूरमध्ये महिन्याभरात ५ हजार ६०३ बेशिस्त नागरिकांकडून दंड वसूल झाला आहे. तसेच अस्वच्छता पसरवू नका असे आवाहन पालिकेकडून नागरिकांना करण्यात आले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com