Nagpur : पेपर संपल्यानंतर मित्रांसोबत पोहायला गेला आणि घात झाला; नागपुरातील धक्कादायक घटना

मित्रांसोबत पोहायला गेलेल्या १९ वर्षीय विद्यार्थ्याचा अंबाझरी तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
nagpur news
nagpur news saam tv

नागपूर : नागपुरातून (Nagpur) हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. मित्रांसोबत पोहायला गेलेल्या १९ वर्षीय विद्यार्थ्याचा अंबाझरी तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदर घटना आज दुपारी ३ ते साडेतीन वाजताच्या सुमारास घडली आहे. या विद्यार्थ्याच्या मृत्यूने परिसरात खळबळ उडाली आहे. (19 years old Student drowns in Ambazari lake in Nagpur )

nagpur news
Hingoli : महाराष्ट्रातील भाविकांच्या वाहनाला कर्नाटकमध्ये अपघात; तिघे जागीच ठार, सहा जखमी

मित्रांसोबत पोहायला गेलेल्या 19 वर्षीय विद्यार्थ्याचा अंबाझरी (Ambazari) तलावात बुडून मृत्यू झाला आहे. कुणाल राजकुमार बर्वे असे विद्यार्थ्याचे नाव आहे. सदर विद्यार्थी आर.एस.मुंडले या वाणिज्य शाखेतील प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे.

nagpur news
भटक्या कुत्र्यांची सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी घेतलीय धास्ती; नेमकं काय घडलं होतं?

मिळालेल्या माहितीनुसार, कुणाल आज दुपारी पेपर संपल्यानंतर आपल्या मित्रांसह अंबाझरी तलावाजळव फिरायला गेला होता. त्यावेळी त्याच्यासोबत मित्र देखील होते. तलावाजवळ पोहोचल्यानंतर त्याचे मित्र पोहण्यासाठी उतरले.

मित्र पोहायला तलावात उतरल्यानंतर कुणालला देखील मोह झाला. त्यामुळे तोही तलावात पोहण्यासाठी गेला. कुणाल तलावात उतरताच पाण्यात बुडायला लागला. मात्र, कुणाल बुडताना त्याच्या मित्रांना तो नाटक करत असल्याचे वाटले. पण काही वेळानंतर तो दिसेनासा झाला. हा सगळा प्रकार स्टंट करताना घडला, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, या सगळ्यांमध्ये आज एका विद्यार्थ्यांला जिवाला मुकावे लागले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com