Nagpur News : नागपूर पोलीस 'अ‍ॅक्शन मोड'वर; जबरदस्तीने पैशांची मागणी करणाऱ्या तृतीयपंथियांविरोधात होणार कारवाई

हैदोस घालणाऱ्या तृतीयपंथीयांविरोधात होणार कारवाई
Nagpur News
Nagpur NewsSaam Tv

Nagpur News : समारंभात जाऊन किंवा रस्त्यावर जबरदस्ती पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयांविरोधात आता नागपूर पोलीसांनी विशेष मोहिम सुरु केलीय. नागपूर पोलीसांनी शहरातील वेगवेगळ्या गटातील ४८ प्रमुख किन्नरांना १४४ ची नोटीस बजावलीय.

Nagpur News
Wrestlers Protest : ब्रिजभूषण यांना मोठा झटका, नॅशनल चॅम्पियनशिपवर कुस्तीपटूंचा 'बहिष्कार'

त्यामुळे आता न बोलावता तृतीयपंथीय कुणाच्या घरी, समारंभात गेले, त्यांना जबरदस्तीने पैसे मागीतले, किंवा रस्त्यावर लोकांकडून जबरदस्तीने पैसे मागीतल्यास या तृतीयपंथीयांवर थेट खंडणीचा गुन्हा दाखल होणार आहे. कुणी तक्रार नाही दिली, तरिही अशा किन्नरांवर कारवाई होणार, अशी माहिती नागपूर (Nagpur) पोलीस (Police) आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलीय.

Nagpur News
Shinde vs Thackeray : एकनाथ शिंदेंचं पद बेकायदेशीर; ठाकरे गटाचा निवडणूक आयोगासमोर मोठा दावा

नागपूर शहरात गेल्या काही दिवसांत काही तृतीयपंथीयांचा हैदोस वाढलाय. लग्न समारंभ, बारसं, किंवा मृत्यू झालेल्यांच्या घरी जायचं, त्यांच्याकडून जबरदस्तीने पैसे मागायचे. पैसे नाही दिले तर गोंधळ करायचा. शिवाय रस्त्यावर, सिग्नलवर जबरदस्तीने पैसे मागायचे, पैसे दिले नाही तर आपत्तीजनक कृत्य करायचं. या वाढत्या घटनांमुळे नागपूर पोलीसांनी आता तृतीयपंथीयांविरोधात कारवाईची मोहिम सुरु केलीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com