Nagpur News : हत्तीनंतर ४ वाघ आणि ४ बिबटे गुजरातला; नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमधून गुपचूप रवाना

हत्तीनंतर विदर्भातील चार वाघ आणि चार बिबटे गुजरातला पाठविण्यात आले आहेत
file Photo
file PhotoSaam tv

Nagpur News : हत्तीनंतर विदर्भातील चार वाघ आणि चार बिबटे गुजरातला पाठविण्यात आले आहेत. शनिवारी रात्री नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटर मधील चार वाघ आणि चार बिबट गुजरात च्या जामनगर येथे हलविण्यात आले. मात्र, अत्यंत गुपचुप हे प्राणी नेल्याने उलटसुलट चर्चांना उधान आलंय. जामनगर येथील खाजगी प्राणिसंग्रहालयात हे प्राणी नेल्याची चर्चा आहे. तडकाफडकी परवानगी आणि गुपचुप प्राण्यांना नेण्यावरून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. (Latest Marathi News)

file Photo
Imtiyaz Jaleel : रंग काय कोणाच्या बापाची जहागीर आहे का?, इम्तियाज जलील संतापले; थेट मोदींना केला सवाल

नागपूरच्या (Nagpur) गोरेवाडा रेस्क्यू सेंटर मधून शनिवारी मध्यरात्री चार वाघ (Tiger) आणि बिबट गुजरात च्या जामनगर येथे हलविण्यात आले. दोन दिवसांनी जी माहिती बाहेर आली. यासंदर्भात कुठलीही प्रेसनोट वन विभागाने प्रसारित केली नाही.

11 जानेवारीला ब्राह्मपुरी येतील रेस्क्यू केलेला एक वाघ आणि वाघीण बोरिवली येथील संजय गांधी उद्यानात पाठविले होते. यासंदर्भात गोरेवाडा रेस्क्यू सेंटर व्यवस्थापन ने प्रेसनोट च्या माध्यमातून दिली होती. मात्र, यावेळी गोपनीयता का पाळली, हा प्रश्नच आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात वन विभागाचे अधिकारी बोलायला तयार नाही.

file Photo
Nanded News: धाडसी दरोडा..वृध्दांना मारहाण करुन चार लाखांचा ऐवज लुटला; मारहाणीत वृध्द महिलेचा मृत्यू

हे प्राणी जामनगर येथील मोठ्या उद्योगपती च्या खाजगी प्राणिसंग्रहालयात नेल्याची चर्चा आहे. वाघ आणि बिबट प्रदर्शनासाठी नाही तर केवळ जामनगरच्या रेस्क्यू सेंटरला ठेवले जाणार असल्याचं वन विभागाचे अधिकारी खाजगीत सांगतात. मात्र, उद्योगानंतर आता प्राणीही गुजरातला नेण्याचा घाट असल्याचं म्हणत प्राणी प्रेमींनी आंदोलन केलंय.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com