भाजप विजयाचा नागपूरात जल्लोष; भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, मिठाई वाटून आनंद

भाजप विजयाचा नागपूरात जल्लोष; भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, मिठाई वाटून आनंद
भाजप विजयाचा नागपूरात जल्लोष; भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, मिठाई वाटून आनंद
Nagpur BJPSaam tv

नागपूर : राज्य विधान परिषद निवडणूकीत भाजपला मिळालेल्या यशानंतर भाजप कार्यकर्त्यांनी नागपुरात जल्लोष साजरा केला. ढोल ताशांच्‍या गजरात फटाके फोडत, मिठाई वाटून कार्यकत्‍र्यांनी (Nagpur News) जल्‍लोष केला. (nagpur news BJP victory in Nagpur BJP burst firecrackers and distributed sweets)

विधान परिषद निवडणूकीत (BJP) भाजपने महाविकास आघाडीला (Mahavikas Aaghadi) धक्‍का देत विजय मिळविला आहे. हा विजय मोठा मानला जात असून या विजयाचा नागपूरात जल्‍लोष करण्यात आला. भाजप आमदार प्रवीण दटके, कृष्णा खोपडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते शहरातील महाल परिसरातील टिळक पुतळा येथे येऊन विजयचा जल्लोष केला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि एकमेकांना मिठाई वाटून या आनंद व्यक्त केला. ढोल ताशांचा गजरात महिला कार्यकर्त्यांनी फुगळी खेळून, नाचत- गाजत विजयोत्सव साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा जयघोष करीत भाजपच्या विजयाचा जोरदार घोषणा दिल्या.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com