रेशनिंगचा काळाबाजार; १५ लाखाचा गहू, तांदूळ जप्‍त

रेशनिंगचा काळाबाजार; १५ लाखाचा गहू, तांदूळ जप्‍त
Ration
RationSaam tv

नागपूर : नागपूरच्या नंदनवन पोलीसानी हसनबागमध्ये सापळा रचून रेशनिंगच्या धान्याचा काळाबाजाराचा पर्दाफाश केला. यासोबतच ट्रक चालकाला ताब्यात घेत 15 लाख रुपयांचा गहू तांदूळ जप्त (Nagpur News) केला आहे. (nagpur news Black market of rations 15 lakh wheat rice seized)

Ration
३६ इंच उंचीचा नवरा, ३१ इंच उंचीची नवरी; अनोख्या लग्नसोहळ्याची तुफान चर्चा

नागरिकांच्या हक्काचे सरकारी स्वस्त धान्य काळाबाजारी करत विकण्याचा गोरखधंदा या ठिकाणी सुरू होता. याआधी सुद्धा अशा घटना घडल्या आहेत. त्यानुसार नंदनवन पोलीसांना (Police) रेशनिंगचे धान्य (Ration) रात्री काळाबाजार करण्यासाठी एका ट्रकमधून जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. हसनबाग चौकाकडे येणाऱ्या मार्गावर सापळा लावून रात्री दोनच्या सुमारास एका ट्रकला (क्र. एमएच 40, सीडी 7005) या ट्रकला थांबविण्यात आले. जावेद शेख उर्फ बाबू शेख या ट्रक चालकाची चौकशी करण्यात आली.

बिल पावती नाही

ट्रकमध्ये गहू व तांदुळाचे पोते होते. त्याबाबत कुठलाही कागद, बिल किंवा ऑर्डरची कॉपी नव्हती. पोलीसानी खाक्या दाखविल्यावर ताजबाग परिसरातून ही पोती ट्रकमध्ये भरून कलमन्यात विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे कबुल केले. पोलीसांनी अन्न पुरवठा विभागाला याची माहिती दिली आणि सगळा माल जप्त केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com