Nagpur News : तलावात पाय धुण्यासाठी गेला आणि घात झाला; नागपुरात तरुणासोबत घडली भयंकर घटना

नागपुरातून धक्कादायक घटना समोर आली आहे.
Nagpur News
Nagpur News Saam tv

Nagpur News : नागपुरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील मोहगावातून धक्कायक घटना समोर आली आहे. तलावात पाय धुण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रविवारी ही दुर्घटना घडली. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नागपुरातील मोहगाव झिल्पी तलावात ही घटना घडली आहे. (Latest Marathi News)

Nagpur News
Kolhapur Crime : शिक्षक की हैवान? नववी-दहावीच्या विद्यार्थीनींना दाखवत होता 'तसले' व्हिडीओ

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या (Nagpur) मोहगावात १५ ते २० मित्र झिल्पी तलावाजवळ गेले होते. त्यावेळी आशीष दिगांबर मराठे याला तलावाच्या पाण्यात पाय धुण्याचा मोह झाला. त्यामुळे आशीष तलावात पाय धुण्यासाठी गेला. मात्र, त्यावेळी आशीषसोबत घात झाला. आशीषचा तलावात बुडून मृत्यू झाला.

मृत्यूनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेनंतर पोलीस पथक आणि अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर आज, सायंकाळी अग्निशामक दलाच्या पथकाला आशीषचा मृतदेह सापडला. त्यानंतर अग्निशानक दलाच्या पथकाने तलावातून मृतदेह बाहेर काढला. मृतक आशीष दिगांबर मराठे हा मूळ निवासी भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील असून सध्या खापरी पुनर्वसन कॉलनी येथे वास्तव्याला होता.

Nagpur News
Pune Crime News: पुण्यात तरुणांचा धुडगूस सुरूच! दोन गटात मारामारी, तुफान दगडफेक करत घातला राडा

तीन वर्षात परिवार गमावला; मुलगी अन पतीपाठोपाठ मुलानेही सोडले प्राण

पहूर (जळगाव) : मुलगी आणि पतीपाठोपाठ जगण्याचा आधार असलेल्या एकुलत्या एक मुलाचाही मृत्यू झाल्याने दुर्देवी मातेवर दुःखाचा डोंगर कोसळल्याची घटना (Jalgaon News) पहूर येथे घडली.

तीन वर्षांपूर्वी मुलगी रोहिणी अठरा वर्षांची असताना अपस्मार आजाराने मृत्युमुखी पडली. दीड वर्षांपूर्वी पती मनोज रमेश सोनवणे यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. मुलगी आणि पती गमावल्याचे दुःख उराशी कवटाळत जगण्याचा आधार असलेल्या एकुलत्या एक मुलाला शिकवून बँकेत अधिकारी बनवावं, असे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मातेला मात्र त्याच्याच अंत्ययात्रेत मंगल अक्षता टाकण्याची दुर्दैवी वेळ आली.

ही हृदयस्पर्शी कहाणी आहे पहूर कसबे येथील रहिवासी रंजना मनोज सोनवणे यांची. शनिवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास त्यांचा मुलगा रघुवीर मनोज सोनवणे (वय १९) याचे अपस्मार आजाराने निधन झाले. गेल्या अडीच महिन्यांपासून तो अंथरुणावर खिळून होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com