Nagpur Maharajbagh : महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील प्राणी असलेले पिंजरे धोकादायक स्थितीत; पर्यटकांचा जीव धोक्यात

130 वर्षे जुन्या प्राणिसंग्रहालयाला अद्यावत करणे गरजेचे
Nagpur Maharajbagh
Nagpur MaharajbaghSaam Tv

Latest Nagpur News : नागपुरातील 130 वर्षे जुन्या असलेल्या महाराजबाग प्राणिसंग्रहालय खिळखिळे झाले आहे. या प्राणिसंग्रहालयातील प्राणी असलेले पिंजरे धोकादायक स्थितीत आहे. त्यामुळं याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांचा जीव धोक्यात आलाय.

Nagpur Maharajbagh
Aurangabad Renaming : औरंगाबादच्या नामांतरावर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया; म्हणाले, बाळासाहेबांची इच्छा....'

नागपुरातील (Nagpur) महाराजबाग प्राणिसंग्रहालयाला 130 वर्षे पूर्ण झालेय. विदर्भातील आकर्षणाचं केंद्र असलेले हे प्राणीसंग्रहालय मात्र आता खिळखिळे झालेय. निधी अभावी या प्राणीसंग्रहालय विकास खुंटलाय. परिणामी प्राणी असलेले पिंजरे गंजलेय, काही ठिकाणी तुटले आहेत, धोकादायक स्थितीत आहे.

नव्या नियमानुसार प्राणी असलेल्या ठिकाणी पिंजरे न करता खंदक करणे आवश्यक आहे. यासाठी महाराजबाग प्रशासनाने सरकारकडे 84 कोटी रुपयांचा प्रस्ताव दिलाय. मात्र, त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळं प्राणिसंग्रहालयाची स्थिती वाईट आहे.

Nagpur Maharajbagh
Aurangabad Renaming : एकनाथ शिंदे यांचा रिमोट फडणवीसांकडे...; नामांतरावरून इम्तियाज जलील यांचा आंदोलनाचा इशारा

यापुर्वी महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील पिंजऱ्यातून प्राणी बाहेर आल्याच्या घटना घडल्याय. सुदैवानं यात प्राणहानी झाली नाही. पुन्हा तशी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं वेळीच आवश्यक उपाययोजना करण्याची गरज आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com