Nylon cord: नायलॉन मांजाची छुपी विक्री; बारा विक्रेत्‍यांवर कारवाई

नायलॉन मांजाची छुपी विक्री; बारा विक्रेत्‍यांवर कारवाई
नायलॉन मांजा
नायलॉन मांजाsaam tv

नागपूर : प्रतिबंधित नायलॉन मांजावर विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत कारवाई सुरू आहे. यात नागपूरमध्‍ये बारा विक्रेत्यांवर गुन्हे शाखेने गुन्हे दाखल करून ४०० नायलॉन मांजा बंडल जप्त केले आहे. (nagpur news Covert sale of nylon cats Action against 12 vendors)

नायलॉन मांजा
बनावट विदेशी मद्याची वाहतूक; मुक्‍ताईनगरात जप्‍तीची कारवाई

नायलॉन मांजामुळे (Nylon cord) होणाऱ्या अपघाताची संख्या वाढत असताना दुसऱ्या बाजूने अवैद्य पद्धतीने नायलॉन मांजा विक्री देखील शहरात मोठ्या प्रमाणात होत आहे, नागपूर (Nagpur) खंडपीठाने नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर नागपूर गुन्हे शाखेने (Nagpur Crime Branch) गेल्या २८ दिवसात शहरातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ३२ ठिकाणी छापामार कारवाई करून १६ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

छुप्‍या प्रकारे विक्री सुरूच

एका बाजूने पोलीस (Nagpur Police) कारवाई करत असताना देखील दुकानदार छुप्या पद्धतीने अजूनही नायलॉन मांजा विकत असल्याचे चित्र आहे. अशा विक्रेत्‍यांवर सध्‍या कारवाई सुरू आहे. शिवाय नागरिकांनी आता समजदारी दाखवून पतंग उडविण्याची हौस दुसऱ्याच्या जिवावावर उठणार नाही याची काळजी घेणे महत्वाचे आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com