मध्‍यप्रदेशातून यायचा गाडी चोरीला; चार गाड्यांसह आरोपी ताब्‍यात

मध्‍यप्रदेशातून यायचा गाडी चोरीला; चार गाड्यांसह आरोपी ताब्‍यात
मध्‍यप्रदेशातून यायचा गाडी चोरीला; चार गाड्यांसह आरोपी ताब्‍यात
Nagpur NewsSaam tv

नागपूर : मध्यप्रदेशमधून नागपुरात यायचे. इथे मोटारसायकल चोरी करायची आणि पुन्हा मध्यप्रदेशमध्ये जाऊन राहायचे. असा प्रकार करत असलेल्‍या एका आरोपीला पोलिसांनी (Police) अटक करत त्‍याच्‍याकडून चार गाड्या हस्तगत केल्या आहेत. (nagpur news crime come from Madhya Pradesh to robberd bike)

Nagpur News
ऑनलाईन मुलाखत पडली महागात; लिंक ओपन करताच बँक खात्‍यातून रक्‍कम गायब

आरोपी कितीही शातीर असला तो कुठेही पळून गेला तरी पोलीस त्याला शोधून काढतातच हा नाव लौकिक नागपुर (Nagpur) पोलिसांनी पुन्हा एकदा कायम राखला आहे. नागपूरच्या गणेश पेठ पोलीस स्टेशन हद्दीत बाईक चोरी करून मध्यप्रदेशमध्ये (Madhya Pradesh) पळून गेलेल्या आरोपीला गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी हुडकून काढले आहे.

गाडीची तक्रारीनंतर शोध

काही दिवस अगोदर तहसील पोलीस स्टेशन हद्दीत गाडी चोरी गेल्याची तक्रार दाखल झाली होती. त्याचा तपास पोलिसांनी सुरू केला. अश्याच प्रकारची एक तक्रार गोंदिया पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली होती. त्यातील गाडीची नागपुरात विक्री होणार असल्याची चुणूक पोलिसांना लागली. हिच कडी पोलिसांनी पकडुन १९ वर्षीय आरोपी अतुल सोनावणे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीच्या ४ बाईक हस्तगत केल्या आहेत. पुढील कारवाई तहसील पोलीस करत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com