Nagpur: 'महाज्योती' मध्ये कोट्यवधींचा टॅब्लेट घोटाळा!

टॅब्लेट खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप; 10 हजाराचा टॅब्लेट 18 हजारात
Mahajoti
MahajotiSaam Tv

नागपूर - इतर मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी सुरू झालेल्या 'महाज्योती' (Mahajyoti) अर्थात महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेमध्ये कोट्यवधींचा ‘टॅब्लेट' घोटाळा झाल्याची शंका उपस्थित केली जात आहे. महाज्योतीने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 6 हजार ‘टॅब्लेट' खरेदी केले होते. प्रति टॅब्लेट 18 हजार 899 रुपयांना खरेदी केलेल्या या ‘टॅब्लेट' चे बाजार मूल्य 10 ते 11 हजार रुपये आहे. त्यामुळं या खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे.

महाज्योती कडून एमपीएससी, यूपीएससीसह, जेईई आणि नीट आदी परीक्षांचे प्रशिक्षण दिले जाते. मात्र, करोनाकाळात ऑनलाइन प्रशिक्षण सुरू असल्याने त्यासाठी विद्यार्थ्यांना ‘टॅब्लेट' देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला होता. त्यासाठी सरकारी ई-मार्केटप्लेस या संकेतस्थळावर ई-निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. निविदेनंतर संबंधित कंपनीकडून ‘महाज्योती’ने ६ हजार ‘लेनोव टॅबलेट’ विकत घेतले.

हे देखील पाहा -

या सहा हजार टॅबलेटसाठी ‘महाज्योती’ने सर्व प्रकारचे कर जोडून ११ कोटी ३३ लाख ९४ हजार रुपये संबंधित विक्रेत्याला दिले. यानुसार महाज्योतीने प्रति टॅबलेट १८ हजार ८९९ रुपयांना विकत घेतले. मात्र, बाजारात ही टॅब्लेट ची किंमत १० ते ११ हजार रुपयांवर आहे. त्यात सहा हजार ‘टॅबलेट’ विकत घेणार असल्यास कुठलीही कंपनी त्यावर सवलत दिली असती.

Mahajoti
शिक्षक नेत्यांनाे! विनापरवानगी जिल्हा किंवा तालुका मुख्यालयात जाताय, मग ही बातमी वाचाच

असे असतानाही ‘महाज्योती’ने अकरा हजारांना मिळणारे ‘लेनोवो टॅबलेट’ १८ हजार ८९९ रुपयांना विकत घेतले. त्यामुळे यात घोटाळा झाल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकते आशिष फुलझेले यांनी केला आहे. मात्र, ही खरेदी राज्य सरकारने नेमून दिलेल्या पोर्टल मार्फत झाली'. सर्वात कमी दर असलेल्या कंत्राटदाराकडून हे टॅब्लेट खरेदी करण्यात आले. यात कुठेही घोटाळा झाला नाही' असं स्पष्टीकरण महाज्योती चे संचालक डॉ. बबनराव तायवाडे यांनी केला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com