Nagpur News : पोटच्या मुलांना विष देऊन निर्दयी बापाने केली आत्महत्या; धक्कादायक घटनेने नागपूर हाद्दरलं!

मुलीचा मृत्यू तर मुलावर उपचार सुरू
Crime News
Crime Newssaam tv

Nagpur Crime News : पोटच्या मुलांना विष देऊन निर्दयी बापाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागपूरच्या वाथोडा पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. पती पत्नी वेगळे राहत होते पत्नी नांदायला येत नाही म्हणू हे कृत्य केलं असल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

Crime News
Pune Illegal School : पुण्यात मोठी कारवाई, ३० अनधिकृत शाळा थेट बंद, १३ शाळा बेकायदेशीरपणे सुरुच

नागपूर (Nagpur) शहरातील वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वैष्णवदेवी नगर येथे एका निर्दयी बापाने स्वतःच्या मुलांना विष देऊन स्वतः सुद्धाआत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. अशोक बेले असे मृतक आरोपीचे नाव आहे. या घटनेत मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर मुलावर उपचार सुरू आहेत. आरोपी (Crime News) अशोक बेले आणि त्याची पत्नी यांच्यात गेल्या काही वर्षांपासून कौटुंबिक कारणाने वाद सुरू असल्याने ते विभक्त राहत होते.

मात्र, ठरल्यानुसार दोन्ही मुलं आठवड्यातून एकदा वडीलांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी जात होते. काल दोन्ही मुलांच्या आजोबांनी त्यांना वडिलांकडे सोडले होते. त्यावेळी आरोपीने दोन्ही मुलांना विष दिल. एवढ्यावर न थांबता त्याने स्वतःला गळफास लावत आत्महत्या केली.

Crime News
Accident News: शाळेतून निघाले अन्‌ काळीची झडप; टँकरखाली सापडून मुख्‍याध्‍यापकाचा मृत्‍यू

मुलांना घेण्यासाठी जेव्हा पत्नी कडील व्यक्ती तिथे पोहचला तेव्हा सगळा घटनाक्रम उघडकीस आला. यात मुलीचा मृत्यू झाला तर मुलावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहे. पती पत्नीचा वाद होता मात्र या निर्दयी बापाने एवढं टोकाचं पाऊल उचललं की स्वतःला तर संपवलच पण मुलांना पण विष दिल. या घटनेनंतर परिसरात मोठी खडबड उडाली आहे

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com