आरक्षण पुनर्स्थापित न झाल्यास रस्त्यावर उतरणार; माळी महासंघाची भूमिका

या महासंपर्क अभियानाच्या माध्यमातून माळी समाजाच्या हक्कासाठी जनजागृती करण्यात आली.
आरक्षण पुनर्स्थापित न झाल्यास रस्त्यावर उतरणार; माळी महासंघाची भूमिका
Nagpur NewsSaam Tv

नागपूर - राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळं ओबीसींचं (OBC) राजकीय आरक्षण गेलं. आता मध्य प्रदेश सरकार प्रमाणे महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणासाठी प्रयत्न करावेत, अन्यथा ओबीसी मधील सर्वात मोठा घटक असलेला माळी समाज रस्त्यावर उतरून संघर्ष करेल, असा इशारा माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे (Avinash Thakre) यांनी दिला आहे.

नागपूर (Nagpur) जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील पारडसिंग येथे आयोजित माळी महासंघ महासंपर्क अभियान यात्रेच्या समारोपीय संकल्प सभेत ते बोलत होते. 15 ते 31 मे दरम्यान माळी समाजाच्या महासंपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या विविध क्षेत्रातील समाजबांधव सहभागी झाले होते. या महासंपर्क अभियानाच्या माध्यमातून माळी समाजाच्या हक्कासाठी जनजागृती करण्यात आली.

हे देखील पाहा -

समारोपीय सभेत बांठीया आयोगाच्या कार्यप्रणालीवर आक्षेप घेण्यात आला. राज्यसरकार वेळकाढूपणा करत आहे. मध्य प्रदेश सरकारने अहवाल तयार करून न्यायालयात तो सादर केला. त्यामुळं मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने अहवाल तयार करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. ओबीसींना आरक्षण न मिळाल्यास रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची भूमिका यावेळी घेण्यात आली. समाजातील बेरोजगारांनी उद्योग सुरू करावेत, शेतीवर आधारित उद्योग, महिला सक्षमीकरण, विविध योजनांची माहिती, यावेळी प्रदेशाध्यक्ष अरुण तिखे यांनी दिली.

Nagpur News
Beed: उभ्या बैलगाडीला मोटारसायकल धडकली; दोन जण ठार...

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष प्रमोद हत्ती यांनी केले. तर आभार प्रदर्शन बाळकृष्ण येनकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सावता माळी संस्थेचे अध्यक्ष भेलकर गुरुजी, शेषराव टाकरखेडे, माळी महासंघाचे तुळशीदास फुटाणे, सारंग तिजारे, जितेंद्र डांगोरे, संजय बोबडे, चेतन बेलसरे, श्रीकांत तडस, रवींद्र आंबाडकर, डॉ. श्रीकृष्ण गोरडे, चंद्रकांत बोरकर, राजेश जवारकर, अलका सैनी, ओमप्रकाश कुशवाह, मुकुंद पोटदुखे, धनश्री पाटील, राहुल पलाडे, शंकरराव चौधरी, विजया अंबाडकर यांनी परिश्रम घेतले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com