Nagpur News : नागपुरातील शेकडो वर्षांपासूनचा मारबत-बागड्या उत्सव काय आहे? जाणून घ्या सविस्तर

Nagpur Marbat Festival : नागपूरमध्ये मारबत उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करतात.
Nagpur Marbat Festival
Nagpur Marbat Festival Saam Tv

Nagpur Marbat Festival History

भारतात अनेक रुढी, परंपरा पाळल्या जातात. प्रत्येक राज्यात किंवा शहरात सण, उत्सव वेगवेगळ्या पद्धतीन साजरे करण्याची परंपरा आहे. तसाच एक सण मागील अनेक वर्षांपासून नागपूरमध्ये साजरा केला जातो. नागपूरमध्ये मारबत उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करतात.

मारबत उत्सवात अनेक नागरिक राज्याच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून नागपुरात येतात आणि हा सण साजरा करतात. यामध्ये मुख्यत: दोन पुतळ्यांची मिरवणूक काढली जाते. काळ्या मारबत आणि पिवळी मारबत हे नागपूरमधील श्रद्धास्थान मानली जातात, त्यांचीच मिरवणूक काढली जाते.

Nagpur Marbat Festival
ABHA Health Card: आभा हेल्थ कार्ड म्हणजे काय? एका क्लिकवर तुमच्या आरोग्याची माहिती समजणार

पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे श्रावणी अमावस्येच्या दिवशी हा सण साजरा करण्याची परंपरा आहे. दोन पुतळ्यांची प्रतिकात्मक मिरवणूक काढून त्यांचे दहन केले जाते. या उत्सवासाठी नागपुरातील नागरिक प्रचंड उत्सुक असतात.

मारबत आणि बागड्या हे कशाचे प्रतिक आहे ?

नागपुरात दोन दिवस हा मारबत उत्सव साजरा केला जातो. समाजातील वाईट प्रथा आणि रोग दूर करण्यासाठी ही मिरवणूक काढली जाते. मारबत आणि बागड्या हे वाईटाचे प्रतीक मानले जाते.

शहरात पसरणाऱ्या आजारांपासून मुक्ती व्हावी हा मारबत बांधण्यामागचा उद्देश आहे. जेव्हा हा उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली तेव्हा शहरात रोगराईचा काळ होता. त्यामुळे लोकांमध्ये विश्वास आहे की, मारबत ही परंपरा सुरू झाल्यापासून रोगांपासून सुटका होते. ही परंपरा आजही लोक मोठ्या उत्साहाने साजरी करतात.

मारबत उत्सवाचा इतिहास

मारबत उत्सवाचा इतिहास हा फार जुना आहे. १८८१ पासून हा उत्सव साजरा केला जात आहे. काळी मारबतला महाभारतातील कंसाची बहीण पुतना राक्षसाचे प्रतिक मानले जाते. तसेच रुप या पुतळ्यालाही देण्यात येते. कृष्णाच्या हातून पुतनाचा वध झाल्यानंतर गावातील वाईट प्रथा दूर व्हाव्यात यासाठी पुतनाचे प्रतिक असलेले काळी मारबतला गावाबाहेर नेले आणि दहन केले. तेव्हापासून काळी मारबत बांधण्याची परंपरा आहे.

मारबत बागड्याची परंपरा ही शेकडो वर्षापासून लाभली आहे. यावेळी लोक 'इडा, पीडा, खासी खोकला घेऊन जा गे मारबत!' अशा घोषणा देतात. म्हणजे शहरातील सर्व वाईट प्रथा, रोग,नष्ट व्हाव्यात. यासाठी लोक प्रार्थना करतात.

Nagpur Marbat Festival
Ganesh Chaturthi 2023 Recipe : १० दिवस टिकतील असे खुसखुशीत रव्याचे मोदक; बनतील चविष्ट-टेस्टी, नक्की ट्राय करा

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com