शौक पूर्ण करण्यासाठी चोरी केले आईचेच दागिने

शौक पूर्ण करण्यासाठी चोरी केले आईचेच दागिने
शौक पूर्ण करण्यासाठी चोरी केले आईचेच दागिने
Nagpur CrimeSaam tv

नागपूर : स्वतःच्याच घरातच कोणी चोरी करू शकते हा प्रकार ऐकायला अजब वाटत असला तरी अशा प्रकारची घटना नागपूरच्या वाठोडा पोलीस स्टेशन हद्दीत घडली. स्‍वतःच्‍याच घरातील आईचे सोन्या- चांदीचे दागिने मुलाने शौक पुर्ण करण्याकरिता चोरी केले. मात्र आता तो पोलीस (Police) कोठडीत पोचला आहे. (nagpur news Mother jewelry stolen child to enjoy)

Nagpur Crime
व्‍हॉटस्‌ॲपवर व्‍हीडीओ धडकताच घरच्‍यांना सुखद धक्‍का; १४ वर्षांची प्रतीक्षा संपली

स्वतःचे शौक पूर्ण करण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. नागपुरातील (Nagpur) एका मुलाने तर आपल्या शौक भागविण्यासाठी चक्क घरात आईच्या दागिन्यांची चोरी केली. आईला जेव्हा दागिन्यांची गरज पडली आणि तिने कपाटात बघितले असता दागिने घरात नव्हते. घरात चोरी झाली असावी या उद्देशाने आईने (Crime News) पोलिसात तक्रार दाखल केली.

पोलिसांच्‍या तपासात सत्‍य बाहेर

पोलिसांनी चोरीचा तपास सुरू केला असता चक्क त्या आईचा मुलगाच चोर निघाला. पोलिसांनी घरातून राहता चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या असून त्याच्याकडून संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे. या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली असून स्वतःच्या घरात आपली मालमत्ता सुरक्षित नाही. घरातील मेंबर अशा प्रकारचे कृत्य करू शकते का असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित व्हायला लागले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com