मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचा तळतळाट सरकारला लागला; जल्‍लोष करत एसटी कर्मचाऱ्यांचे मत

मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचा तळतळाट सरकारला लागला; जल्‍लोष करत एसटी कर्मचाऱ्यांचे मत
Nagpur News
Nagpur NewsSaam tv

नागपूर : राज्यात सत्तांतर होत असताना काही महिन्यांपूर्वीपर्यंत महाविकास आघाडी सरकार विरोधात सर्वात मोठा संप पुकारणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी फटाके फोडून आणि मिठाई वाटून महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) सरकार कोसळल्याचा जल्लोष केला आहे. नागपूरच्या गणेश पेठ मध्यवर्ती बस स्थानकासमोर एसटी कर्मचाऱ्यांच्या (St Employee) कष्टकरी जनसंघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. (nagpur news ST employees doing celebration in collapsed maharashtra goverment)

Nagpur News
आघाडी सरकार कोसळले अन्‌ एसटी कर्मचाऱ्यांनी फोडले फटाके

रास्त मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी अभूतपूर्व संप केला होता. सहा महिन्याच्या (Nagpur News) संप दरम्यान 124 एसटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. मात्र, महाविकास आघाडी सरकारने एक लाखापेक्षा जास्त एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही. आंदोलनादरम्यान मृत पावलेल्या 124 एसटी कर्मचाऱ्यांचा तसेच त्यांच्या कुटुंबियांचा तळतळाट या सरकारला लागल्याचे मत जल्लोष करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

नवीन सरकारने लक्ष द्यावे

राज्यात येणारे नवीन सरकार आमच्या मागण्यांकडे लक्ष घालेल; अशी आमची अपेक्षा असून नवीन सरकारच्या कार्यकाळात आम्हाला शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळेल व वेतन वाढ मिळेल अशी अपेक्षा जल्लोष करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com