Nagpur News: इमारतीच्‍या पार्किंगमध्‍ये तंबाखूचा कारखाना; छापा टाकत पोलिसांची कारवाई

इमारतीच्‍या पार्किंगमध्‍ये तंबाखूचा कारखाना; छापा टाकत पोलिसांची कारवाई
Nagpur News
Nagpur NewsSaam tv

नागपूर : नागपूरातील एका बिल्‍डींगच्‍या पार्किंगमध्‍ये अवैधरित्‍या तंबाखूचा कारखाना सुरू होता. या कारखान्‍यावर (Nagpur) नागपूर गुन्हे शाखेच्‍या पथकाने छापा टाकून मुद्देमाल जप्‍त केला आहे. (Maharashtra News)

Nagpur News
Pune Crime: अवघ्या तीन हजार रुपयांसाठी आयटी इंजिनियरची हत्या

नागपूरच्या लकडगंज पोलीस स्टेशन हद्दीतील येनुरकर बिल्डिंगमध्ये पार्किंग परिसरात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा कारखाना सुरू होता. नागपूर गुन्हे शाखेला ही माहिती मिळताच या कारखान्यावर छापा टाकून कारसह १८ लाखांचा सुगंधित तंबाखूचा साठा पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी आरोपी रुपेश नंदनवार व दत्तू सराटकर यांना अटक करण्यात आली आहे.

Nagpur News
Dhule News: विद्युत पोलवरील चैनल, ट्रॅक्‍टर चोरी; तीन चोरटे पोलिसांच्‍या ताब्‍यात

बारा लाखाची तंबाखू

२२ पोत्यात भरून ठेवलेला या सुगंधित तंबाखूची किंमत बारा लाख रुपये एवढी आहे. या कारखान्याच्या सूत्रधार दुर्गेश अग्रवाल असून गेल्या काही महिन्यांपासून दुर्गेश प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा कारखाना चालवित होता. या ठिकाणाहून (Police) पोलिसांनी कार, सुगंधित तंबाखू, मशीन, रिकामी पाकिटे, झाकन आदी साहित्य जप्त केले आहे. तर या कारखान्याच्या सूत्रधार दुर्गेश अग्रवाल फरार असून त्याच्या शोध पोलीस घेत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com