लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Nagpur NewsSaam tv

नागपूर : नागपूरातील जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीत अल्पवयीन मुलीवर अत्‍याचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. एका 27 वर्षीय तरुणाने 15 वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमीष दाखवत सलग दोन वर्षे अत्याचार (Crime) केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. (nagpur news Torture of a girl by the lure of marriage)

Nagpur News
वृद्ध महिलेचा उष्‍माघाताने मृत्‍यू; शेतात गेल्‍या त्‍या परतल्‍याच नाही!

नागपूरातील (Nagpur) अमितेश आशिष श्रीवास असे संशयीत आरोपीचे नाव आहे. त्याने 15 वर्षीय तरुणीला प्रेमाच्‍या जाळ्यात ओढले. या दरम्‍यान त्‍याने लग्नाचे आमिष दाखवून अत्‍याचार केला. दोघेही एकाच परिसरात राहत असल्याने रोज भेट व्हायची. मात्र गेल्या काही दिवसांपासून तो पीडित तरुणीला टाळत होता.

अखेर मुलीची पोलिसात धाव

मुलीने लग्नाविषयी विचारले असता तो जीवे मारण्याची धमकी देत असल्याने अखेर पीडित अल्पवयीन तरुणीने आरोपी अमितेश विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी (Police) मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.