Nagpur : पॅरामेडिकल तरुणीच्या डोक्याला पिस्तूल लावून धमकावणाऱ्याला अटक!
Nagpur : पॅरामेडिकल तरुणीच्या डोक्याला पिस्तूल लावून धमकावणाऱ्याला अटक!मंगेश मोहिते

Nagpur : पॅरामेडिकल तरुणीच्या डोक्याला पिस्तूल लावून धमकावणाऱ्याला अटक!

आरोपी हा नागपूर वरून पुण्याला पळून गेला होता. दोन दिवस तिथे राहिला. मात्र त्याच्या जवळचे पैसे संपल्याने तो परत नागपुरात आला.

-- मंगेश मोहिते

नागपूर : तीन दिवसांपूर्वी नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पॅरा मेडिकलच्या इंटर्न युवतीच्या डोक्याला पिस्तूल लावून तिला धमकवणाऱ्या आरोपीला अटक करण्यात अखेर गुन्हे शाखा पोलिसांना यश आलं आहे. त्याने हे सगळं का केलं याचा तपास पोलीस करत आहेत. नागपूर च्या मेडिकल कॉलेज परिसरात घुसून पॅरा मेडिकल ची विद्यार्थिनी असलेल्या युवती वर गन ताणून विक्की चकोले या आरोपीने तिला धमकावत जीवे मारण्याची धमकी दिली होती.

हे देखील पहा :

त्याने फायर सुद्धा केलं मात्र फायर झाला नाही आणि युवतीचे प्राण वाचले. या घटनेनंतर आरोपी मात्र पळून गेला होता. गुन्हे शाखेचे सहा पथके आरोपीचा शोध घेत होती. मात्र, तो हातात येत नव्हता. आज सकाळी तो रेल्वे स्टेशन परिसरात असल्याची माहिती मिळाली आणि पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. आरोपी हा नागपूर वरून पुण्याला पळून गेला होता. दोन दिवस तिथे राहिला. मात्र त्याच्या जवळचे पैसे संपल्याने तो परत नागपुरात आला.

Nagpur : पॅरामेडिकल तरुणीच्या डोक्याला पिस्तूल लावून धमकावणाऱ्याला अटक!
Virar : ड्रममध्ये आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; दुर्गंधीमुळे घटना उघडकीस!
Nagpur : पॅरामेडिकल तरुणीच्या डोक्याला पिस्तूल लावून धमकावणाऱ्याला अटक!
देहव्यापारासाठी गुजरातला जाणाऱ्या १० महिलांना नागपूर पोलिसांकडून अटक!

मात्र तो डिप्रेशन मध्ये असून आत्महत्या करण्याच्या तयारीत होता. वेळीच पोलिसांनी त्याला अटक केली. पोलीस आता त्याने युवतीवर गोळी झाडण्याचा प्रयत्न का केला? नेमकं काय घडलं होतं? याचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे नागपूर शासकीय महाविद्यालयाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आरोपी पकडून त्याला शिक्षा होईल हे खरं, मात्र मेडिकल कॉलेजसारख्या ठिकाणी खुले आम युवतीवर पिस्तूल रोखली यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com