नागपूर पोलिसांना फेक कॉल चा मनस्ताप !

नागपूर पोलिसांना फेक कॉल केल्यास गुन्हा दाखल होणार
नागपूर पोलिसांना फेक कॉल चा मनस्ताप !
नागपूर पोलिसांना फेक कॉल चा मनस्ताप !SaamTv

नागपूर : नागपूर पोलिसांना एकिकडे शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा बसविण्याचं आव्हान असताना दुसरीकडे फेक कॉल्स मुळे पोलीस त्रस्त झाले आहेत. सध्या पोलीस कंट्रोल रुमला फेक कॉल्स ची संख्या वाढलीय. त्यामुळे फेक कॉल करणाऱ्यांवर पोलीस थेट गुन्हे दाखल करणार आहेत. Nagpur Police Annoyed By Fake Calls

हे देखील पहा -

नागपूर शहर पोलिस नियंत्रण कक्षाला गेल्या काही दिवसांपासून १०० या टोल फ्री नंबरवर फेक कॉल येताहेत. त्यामळे पोलिस त्रस्त आहेत. अनेकदा केवळ गंमत म्हणून पोलिस नियंत्रण कक्षाला कॉल लावण्यात येतो. घटना घडल्याची खोटी माहिती देण्यात येते. पोलिस तातडीनं घटनास्थळावर जातात, तेव्हा तेथे शांतता असते.

नागपूर पोलिसांना फेक कॉल चा मनस्ताप !
अकोला जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी

फोन करणारा व्यक्तीही हजर नसतो. पोलिसांना केवळ त्रस्त करण्यासाठी काही जण कॉल करीत असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे आता फेक कॉल करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. फेक कॉल करणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली असून आता पोलिस थेट गुन्हे दाखल करणार आहेत.

गेल्या दोन वर्षांपूर्वी पोलिस नियंत्रण कक्षाला फोन लावून महिला कर्मचाऱ्यांशी उद्धट भाषा वापणाऱ्यांचे कॉल वाढले होते. त्यामुळे तत्कालीन पोलिस आयुक्त के. वेंकटेशम् यांनीही आक्रमक भूमिका घेत थेट गुन्हे दाखल केले होते. त्यामुळे पोलिसांचा वचक निर्माण झाला होता. तेव्हापासून तसे कॉल बंद झाले होते. मात्र, आता पुन्हा फेक सुरू झाले आहेत. पोलिसांच्या या भूमिकेमुळे यापुढे पोलिसांची कुणीही टिंगलटवाळी करण्याची हिंमत करणार नाही.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com