देहव्यापारासाठी गुजरातला जाणाऱ्या १० महिलांना नागपूर पोलिसांकडून अटक!

नागपूर गुन्हे शाखा आणि एटीएस ने नागपूर रेल्वे स्थानकावर एक संयुक्त कारवाई करत 10 महिला आणि एका पुरुषाला अटक केली असून त्यांना मानवी तस्करी आणि देहव्यापारासाठी गुजरात नेलं जात होतं.
देहव्यापारासाठी गुजरातला जाणाऱ्या १० महिलांना नागपूर पोलिसांकडून अटक!
देहव्यापारासाठी गुजरातला जाणाऱ्या १० महिलांना नागपूर पोलिसांकडून अटक!File

-- मंगेश मोहिते

नागपूर : नागपूर गुन्हे शाखा आणि एटीएस ने नागपूर रेल्वे स्थानकावर एक संयुक्त कारवाई करत 10 महिला आणि एका पुरुषाला अटक केली असून त्यांना मानवी तस्करी आणि देहव्यापारासाठी गुजरात नेलं जात होतं. हे सगळे बांगलादेशी असल्याचं प्रथमदर्शनी पुढे आलं आहे. मात्र, या आंतरराष्ट्रीय टोळी ला घेऊन जाणारा सूत्रधार हाती लागला नाही. पोलीस आता याचा सखोल तपास करत आहेत.

हे देखील पहा :

मानवी तस्करी आणि देहव्यापाराची आंतरराष्ट्रीय टोळी नागपूर गुन्हे आणि एटीएस च्या हाती लागली आहे. नागपूर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की काही बांगलादेशी नागरिकांना घेऊन एक टोळी हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेस ने गुजरातच्या सुरतला जात आहेत.

यात महिला आणि पुरुष असून त्यांना देहव्यापर आणि मजुरीसाठी नेलं जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नागपूर रेल्वे स्थानकावर सापळा रचला आणि ट्रेन येताच धाड टाकली तेव्हा 10 महिला आणि एक पुरुष संशयित आढळून आले त्यांची तपासणी केली असता त्यांचे आधारकार्ड सुद्धा खोटे निघाले.

देहव्यापारासाठी गुजरातला जाणाऱ्या १० महिलांना नागपूर पोलिसांकडून अटक!
अवैध गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे गृहमंत्र्यांचे निर्देश!
देहव्यापारासाठी गुजरातला जाणाऱ्या १० महिलांना नागपूर पोलिसांकडून अटक!
रेल्वे अपघातात पाय गमावणाऱ्या रुपाली मोरेला ठाणे महापालिकेने दिले हक्काचे घर
देहव्यापारासाठी गुजरातला जाणाऱ्या १० महिलांना नागपूर पोलिसांकडून अटक!
बहिणीकडे निघालेल्या भावास लोखंडी पाईपने मारहाण; हल्लेखोरास बेड्या!

यात दोन युवती असून त्यांचा वापर देहव्यापर करण्यासाठी केला जाणार होता. तर काही बालक आणि महिला चा वापर मजुरी साठी केला जाणार होता. असे पोलिसांच्या हाती लागलेल्या पुराव्या वरून दिसून येत आहे. मात्र या टोळीचा सूत्रधार पोलिसांच्या हाती लागला नाही. पोलीस आता बांगलादेश ऍम्बेसीकडे या संदर्भात माहिती पाठवत आहेत. हे लोक साधारण असले तरी हे बांगलादेशी असेल तर मग ते भारतात कसे आले त्यांना बॉर्डर पार करण्यात कोणी मदत केली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पोलीस शोधत आहेत.

पकडण्यात आलेल्या महिला आणि पुरुष यांच्या कडून मिळालेल्या माहिती वरून दोन युवती चा वापर देहव्यापर साठी होणार होता हे स्पष्ट झालं आहे. मात्र, अश्या प्रकारे मानवी तस्करी हा मोठा अपराध असून यामागे मोठी टोळी असण्याची शक्यता आहे. या संदर्भात आता गणेशपेठ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आले असून पुढील चौकशी आता पोलीस करत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com