सुगंधी तंबाखूचा गोरखधंदा नागपूर पोलिसांकडून बंद; एकला अटक

राज्यात सुगंधी तंबाखू आणि गुटखा बंदी आहे.
सुगंधी तंबाखूचा गोरखधंदा नागपूर पोलिसांकडून बंद; एकला अटक
सुगंधी तंबाखूचा गोरखधंदा नागपूर पोलिसांकडून बंद; एकला अटकमंगेश मोहिते

मंगेश मोहिते

नागपूर - कळमना Klamana पोलीस स्टेशन Police Stataion हद्दीत राज्यात बॅन असलेल्या सुगंधी तंबाखू Tobacco मध्ये भेसळ करून विकण्याचा गोरखधंदा सुरू होता. त्यावर पोलिसांनी छापा टाकून 6 लाख रुपये किमतीचा भेसळ युक्त सुगंधी तंबाखू जप्त केला असून एका आरोपीला अटक केली आहे. राज्यात सुगंधी तंबाखू आणि गुटखा बंदी आहे.

हे देखील पहा -

मात्र अवैध मार्गाने त्याचा मोठा गोरखधंदा होतो. एवढंच नाही तर सुगंधी तंबाखू मध्ये भेसळ करत डुप्लिकेट तंबाखू मिसळण्यात येतो. हा सगळा गोरख धंदा कळमना पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी सापळा रचत या ठिकाणी धाड टाकली.

सुगंधी तंबाखूचा गोरखधंदा नागपूर पोलिसांकडून बंद; एकला अटक
पर्यावरणाचा संदेश देत झाडाच्या फांदीत गणरायाची प्रतिष्ठापना

त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुगंधी तंबाखूचे डब्बे तर काही खाली डब्बे आणि एक मशीन मिळून आली. पोलिसांनी 6 लाख रुपये किमतीचा सुगंधी तंबाखू आणि इतर साहित्य जप्त केले आहे. तर हा गोरख धंदा चालविणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. बंदी असलेल्या तंबाखूत भेसळ युक्त तंबाखू मिळून तो विकला जात होता. यामुळे नागरिकांना आरोग्याचा मोठा धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे असा भेसळ धंदा करणाऱ्यांना सजा होणं गरजेचं आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com