Nagpur : गोरगरीबांच्या रेशन धान्यावर डल्ला; चढ्या दरात विकणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश

रेशन धारकांना त्यांच्या हक्काच मिळालेल धान्य त्यांच्याकडून खरेदी करून ते बाजारात चढ्या दराने विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात नागपूर पोलिसांना यश आलं आहे.
nagpur crime news
nagpur crime news saam tv

Nagpur Crime News : रेशन धारकांना त्यांच्या हक्काच मिळालेल धान्य त्यांच्याकडून खरेदी करून ते बाजारात चढ्या दराने विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात नागपूर पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. नागपूर पोलिासांनी त्यांच्याकडून गहू आणि इतर साहित्य जप्त केला आहे. (Latest Marathi News)

nagpur crime news
Pune News: पुण्यात १३ वर्षीय मुलीचा विनयभंग; माझी बायको होशील का?; नाहीतर उचलून...

मिळालेल्या माहितीनुसार, सामान्य गरीब माणसाला अन्नधान्य मिळावा यासाठी सरकारकडून राशन दुकानामार्फत स्वस्तात धान्य दिला जाते. मात्र, या धान्यावर सुद्धा अनेकांची नजर असल्याचा पाहायला मिळते. वस्त्यांमध्ये फिरून गरीब माणसाला हेरत त्याला मिळालेलं धान्य त्याच्याकडून विकत घेऊन ते धान्य बाजारात चढ्या दराने विकणारी टोळी नागपुरात (Nagpur) सक्रिय झाली .

ही टोळी वस्त्या वस्त्यांमध्ये फिरून गरीब लोकांना पैशाची लालच देत त्यांच्याकडून धान्य विकत घेते. त्यानंतर तेच धान्य बाजारात चढ्या दराने विकतात. अशाच एका टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलं. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून पोलीस आता हे टोळी किती मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे याचा शोध घेत आहे.

nagpur crime news
Mumbai Crime : BMC अधिकारी असल्याचं सांगत करत होता भलतेच कारनामे; असा अडकला जाळ्यात

सामान्य माणसाला त्याच्या हक्काचा मिळालेला धान्य पैशाची लालच देऊन खरेदी करणे गुन्हा आहे. मात्र अनेक टोळके यामध्ये सक्रिय झाले असून त्यांनी हा धंदा सुरू केला असल्याचा चित्र पाहायला मिळते. त्यामुळे यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com