Nagpur: नागपूर पोलीस भरती घोटाळ्यात 'मिशन 100'

पोलीस भरती परीक्षेत डमी उमेदवार बसवून 100 बेरोजगारांना शिपाई बनविण्याची या टोळीचा योजना होती. मात्र, नागपूर पोलिसांना ही योजना हाणून पाडली.
Nagpur: नागपूर पोलीस भरती घोटाळ्यात 'मिशन 100'
Nagpur Police RecruitmentSaam Tv

नागपूर - पोलीस भरती घोटाळा प्रकरणात नवीन माहिती पुढं आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत तीन आरोपींना अटक (Arrest) करण्यात आली आहे. या आरोपींनी हा घोटाळ्यात 'मिशन 100' राबविलं होतं. पोलीस भरती परीक्षेत डमी उमेदवार बसवून 100 बेरोजगारांना शिपाई बनविण्याची या टोळीचा योजना होती. मात्र, नागपूर पोलिसांना (Nagpur Police) ही योजना हाणून पाडली. (Nagpur police recruitment scam)

नागपूर (Nagpur) पोलिसांनी पोलीस भरतीचं रॅकेट उघडकीस आणल आहे. हे रॅकेट औरंगाबादच्या (Aurangabad) ग्रामीण भागात पोलीस भरतीचे कोचिंग क्लासेस (Coaching Classes) चालवत होते. अनेक वर्षापासून हे रॅकेट सक्रिय असल्याची माहिती समोर आहे. लेखी आणि शारिरीक चाचणी परीक्षेत डमी उमेदवार बसवून हे उमेदवार पास करायचे. या बदल्यात एका उमेदवाराकडून 13 ते 15 लाख रुपये घेतले जायचे. सीसीटीव्ही (CCTV) मधील हालचालींवर संशय आल्याने पोलिसांनी हा घोटाळा उघडकीस आणला आहे.

हे देखील पहा -

पोलीस भरती शिवाय इतर विभागातही बोगस भरती केल्याची माहिती पुढं आली आहे. या रॅकेट ने नागपूर शिवाय पिंपरी चिंचवड, पुणे, ठाणे यासह इतर ठिकाणी बनवेगिरी केल्याची माहिती आहे. शारीरिक चाचणीत डमी उमेदवाराला स्टेरॉइड द्यायचे, जेणेकरून हे डमी उमेदवार अधिक सक्षमपणे चाचणी द्यायचे आणि पास व्हायचे.

Nagpur Police Recruitment
सावधान! ओमिक्रॉननंतर आता डेल्टाक्रॉनची दहशत; आढळले २५ रुग्ण

या प्रकरणात पोलिसांनी औरंगाबादच्या जयपाल कंवरलाल, अर्जुन सुलाने आणि तेजस जाधव या तीन आरोपींना अटक केली आहे. या तीन आरोपींना अटक केल्यावर इतर आरोपी भूमिगत झाल्याची माहिती आहे. राज्यातील इतर विभागातील पोलीस भरती आणि विभागामध्ये सुद्धा घोळ झालाय का या दिशेनं पोलीस तपास करत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com