नागपूर की वासेपूर? सर्वाधिक हत्तेच्या घटनांमध्ये जिल्हा देशात पुढे!

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो च्या आकडेवारी धक्कादायक माहिती पुढं आली आहे.
नागपूर की वासेपूर? सर्वाधिक हत्तेच्या घटनांमध्ये जिल्हा देशात पुढे!
नागपूर की वासेपूर? सर्वाधिक हत्तेच्या घटनांमध्ये जिल्हा देशात पुढे!Saam Tv

संजय डाफ

नागपूर: क्राईम सिटी अशी ओळख असलेले नागपूर खुनांच्या घटनांमध्ये देशात सर्वात पुढं असल्याची धक्कादायक माहिती पुढं आली आहे. 2020 मध्ये नागपूरात 97 खुनाच्या घटना घडल्या आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात ही संख्या इतर शहरांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. त्यामुळं नागपूर वासेपूर झालं की काय असा शंका उपस्थित केली जात आहे.

हे देखील पहा-

पाटणा आणि लखनौ ही शहरे देशात गुन्हेगारी साठी कुप्रसिद्ध आहे. मात्र, या शहरांना नागपूर शहराने मागे टाकलं आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारी नुसार 2020 मध्ये देशात सर्वाधिक हत्या या नागपूर शहरात झाल्या.

देशात लोकसंख्येच्या तुलनेत हत्येचा सर्वाधिक 3.9 दर नागपूरचा आहे. 2018 आणि 2019 या वर्षांच्या तुलनेत 2020 मध्ये नागपूरात जास्त खून झाले. आकडेवारी बघितल्यास 2018 मध्ये 72, 2019 मध्ये 90 तर 2020 मध्ये खुनाच्या घटना घडल्या. यात सर्वधिक 25 टक्के घटना या आर्थिक आणि कौटुंबिक वादातून घडल्या आहेत. मात्र, नागपूरात गुन्ह्यांची पार्श्वभूमी आधीपासून आहे, 20 वर्षांची आकडेवारी बघितल्यास सरासरी 100 खून दरवर्षी नागपूरात होतात. मात्र, ही संख्या कमी करण्यासाठी नागपूर पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं नागपूर पोलीस आयुक्त सांगत आहेत.

नागपूर की वासेपूर? सर्वाधिक हत्तेच्या घटनांमध्ये जिल्हा देशात पुढे!
धक्कादायक: कर्मा दल विसर्जनादरम्यान 7 मुलींचा बुडून मृत्यू!

या घटनांमुळे मात्र शहरात भीतीचं वातावरण आहे. क्षुल्लक कारणांसाठी खून होताहेत. शहरात गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिलाय की नाही, असा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळं पोलिसांनी भयमुक्त वातावरण राहील, गुन्हे कमी होतील, या अनुषंगाने प्रयत्न करण्याची गरज आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com