Nagpur : राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह अतिविशिष्ट व्यक्तींचे निवासस्थान असुरक्षित!

अग्निशमन विभागाच्या तपासणीत धक्कादायक वास्तव समोर...
Nagpur : राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह अतिविशिष्ट व्यक्तींचे निवासस्थान असुरक्षित!
विधान भवन नागपूर SaamTvNews

नागपूर : हिवाळी अधिवेशनाबद्दल अद्यापही अनिश्चितता असली तरी प्रशासन मात्र, तयारीला लागलंय. सुरक्षेच्या दृष्टीनं नागपूर महापालिकेच्या अग्निशमन विभागानं शहरातील सरकारी आणि निमसरकारी कार्यालयातील अग्निसुरक्षा यंत्रणा तपासणी केली. या तपासणीत राजभवन, विधानभवन, रामगिरी, देवगिरी, नागभवन, रवी भवन, हैदराबाद हाऊस या अतिमहत्त्वाच्या इमारतीसह प्रमुख इमारती आणि कार्यालयातील अग्निसुरक्षा यंत्रणा बंद स्थितीत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आलीय.

हे देखील पहा :

भंडारापाठोपाठ अहमदनगर येथील सरकारी रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेनंतर सरकारी कार्यालयातील अग्निसुरक्षा यंत्रणेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. मात्र, सरकारी यंत्रणा अद्यापही याबद्दल गंभीर नसल्याचं दिसून येते. महापालिकेच्या अग्निशमन विभागानं राजभवन, विधान भवन, रामगिरी, देवगिरी, नागभवन, रवी भवन, हैदराबाद हाऊस, आमदार निवास यासह शहरातील २८ सरकारी इमारती व विश्रामगृहातील अग्निसुरक्षा यंत्रणेची तपासणी केली.

विधान भवन नागपूर
नांदेड दंगल प्रकरण; आरोपींची पोलिसांसोबत बाचाबाची! पहा Video
विधान भवन नागपूर
ग्रामपंचायतींमधील 7 हजार रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 21 डिसेंबरला मतदान!

कुठे ही यंत्रणा नाही, तर कुठे यंत्रणा आहे, तर ती कार्यरत नसल्याचं उघडकीस आलं. अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यरत नसलेल्या कार्यालयांना अग्निशमन विभागाच्या अधिनियमातील कलम ६ नुसार नोटीस बजावलीय. नोटीस बजावल्यानंतरही सुरक्षा यंत्रणा कार्यरत न केल्यास संबंधित कार्यालयांचा वीज व पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा अग्निशमन विभागानं दिलाय.

विधान भवन नागपूर
नगरमध्ये 74 वर्षीय महिलेवर घरात घुसून मारहाण करत बलात्कार!
विधान भवन नागपूर
शेकडो स्त्रियांची यशस्वी प्रसूती करणाऱ्या परीचारिकेचा स्वतःच्या प्रसूती दरम्यान मृत्यू!

धोका असलेल्या अतिमहत्वाच्या इमारती :

राजभवन, विधानभवन, रामगिरी, देवगिरी, नागभवन, रवी भवन, हैदराबाद हाऊस, सुयोग बिल्डिंग, आमदार निवास, १६० खोल्यांचे गाळे, वनामती (रामदासपेठ), सेमिनरी हिल्स येथील सी.पी.डब्ल्यू. विश्रामगृह, डब्ल्यूसीएल विश्रामगृह, सिव्हिल लाईन, डब्ल्यूसीएल विश्रामगृह, कल्पनानगर, रेल्वे क्लब विश्रामगृह, रेल्वे सातपुडा विश्रामगृह, एम.ई.सी.एल. विश्रामगृह, एनपीटीआय विश्रामगृह, राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर विश्रामगृह, वन विभाग विश्रामगृह. ऑटोमिक एनर्जी विश्रामगृह

अग्निशमन यंत्रणा नसल्यानं किंवा बंद असल्यानं आग लागल्याच्या घटना अनेकदा घडतात. मात्र, तरीही अग्निशमन यंत्रनेबाबत सरकारी यंत्रणाच गंभीर नसल्याचं दिसून येतं. त्यात राज्यपाल आणि मुख्यमंत्री यासारख्या अतिविशिष्ट व्यक्तींच्या निवासस्थानावरही अग्निशमन यंत्रणा बंद असणे गंभीर आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com