Maharashtra Tatkal Ticket Scam Exposed: रेल्वेचं तात्काळ तिकीट बुकिंग करताय? सावधान! नागपूर रेल्वे सुरक्षा दलाने केला मोठ्या लुटमारीचा पर्दाफाश

Nagpur Crime news: नागपुरात बनावट सॉफ्टवेअरचा वापर करून रेल्वेचं तात्काळ तिकीट बुकिंग आणि तिकिटांच्या आडून करण्यात येणाऱ्या लुटमारीचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
Tatkal Ticket Scam
Tatkal Ticket Scam Saam Tv

Nagpur News: सध्या राज्यात फसवणूक आणि काळ्या धंद्याचे प्रकार वाढले आहेत. काळ्या धंद्याच्या आडून लोकांची मोठ्या प्रमाणात लुटमार होत आहे. नागपुरात बनावट सॉफ्टवेअरचा वापर करून रेल्वेचं तात्काळ तिकीट बुकिंग आणि तिकिटांच्या आडून करण्यात येणाऱ्या लुटमारीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणी नागपूर रेल्वे सुरक्षा दलाने एकाला ताब्यात घेतलं आहे. (Latest Marathi News)

नागपूर सुरक्षा दलाने छापा टाकून या काळ्याबाजाराचा भंडाफोड केला आहे. आरपीएफने टाकलेल्या या छाप्यात ८३ लाख रुपयांची हेराफेरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यावेळी आरपीएफने दोन लॅपटॉप, मोबाईल तसेच ५५ लाईव्ह तिकीट आरपीएफने जप्त केले आहे.

Tatkal Ticket Scam
Pune Crime News : जेवणाचा डबा न दिल्यानं पतीने केलेल्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू

या प्रकरणी आरोपी प्रवीण झाडे हा २०१६ पासून रेल्वे तिकिटांचा व्यवसाय करतो. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळे मिळेल त्या दरात लोक रेल्वेची तिकीट खरेदी करत आहे.

त्याचाच फायदा घेत प्रवीण झाडे याने बनावट सॉफ्टवेअरचा वापर करून रेल्वे रिझर्वेशन चे तिकीट मिळवण्यासाठी शक्कल लढवली आहे. त्याने हे सॉफ्टवेअर कुठून बनवलं त्यासोबत अजून यात कोणी सहभागी आहे का. या दृष्टीने देखील आरपीएफ तपास करत आहे.

तुमची फसवणूक कशी टाळाल?

तुम्ही लक्षात घ्या की ईमेल, व्हॉट्सअॅप किंवा तुमचा संपर्क क्रमांकाद्वारे प्राप्त झालेली कोणतीही लिंक बनावट असू शकते. त्यामुळे त्यावर क्लिक करताना तुम्ही त्याची सत्यता सुनिश्चित करावी.

तुमच्या वापरासाठी नसलेले कोणतेही अॅप्लिकेशन डाउनलोड करू नका. कधी कधी तुमची ही सवय तुम्हाला अडचणीत आणू शकते.

Tatkal Ticket Scam
Mumbai Crime News: मर्चंट नेव्हीमध्ये नोकरीच्या नावाखाली तरुणाची लाखोंची फसवणूक, एकाला अटक

कोणत्याही संशयास्पद फोन कॉल किंवा तुमच्या कॉम्प्युटरवर रिमोट ऍक्सेससाठी विचारणाऱ्या कोणालाही कधीही उत्तर देऊ नका.

तुमची वैयक्तिक माहिती जसे की तुमचा पिन कोड, पासवर्ड आणि इतर गोपनीय ठेवा. ते नियमित अंतराने बदलत रहा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com