Women's Day Special: नागपूर आरटीओचं ‘सावित्री पथक’; राज्यातील पहिला प्रयोग

जागतिक महिला दिनानिमित्त या ‘सावित्री पथक’ सुरुवात करण्यात आली.
Women's Day Special: नागपूर आरटीओचं ‘सावित्री पथक’; राज्यातील पहिला प्रयोग
Nagpur Newsसंजय डाफ

नागपूर - महिलांनी वाहतुकीचे नियम पाळावे, त्यांना शिस्त लागावी, रस्ते सुरक्षितता, कारवाई करताना महिला वाहन चालकांना होणारा संकोच लक्षात घेता नागपूर (Nagpur) आरटीओकडून (RTO) महिला अधिकाऱ्यांचं ‘सावित्री पथक’ गठित करण्यात आलं आहे. जागतिक महिला दिनानिमित्त या ‘सावित्री पथक’ सुरुवात करण्यात आली. राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे.

हे देखील पहा -

नागपूर शहर आणि ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयाने जिल्ह्यातील रस्ते सुरक्षितता समिती, जिल्हाधिकारी कार्यालयासोबत समन्वय साधून नागपूर शहर, ग्रामीण, पूर्व नागपूर आरटीओतील महिला अधिकाऱ्यांना घेऊन हे सावित्री पथक तयार केलं आहे. तसंच हे पथक जिल्ह्यातील वेगवेगळया भागात महिलांशी संपर्क साधून त्यांना केंद्र आणि राज्य परिवहन योजनांबाबत माहिती देणे, आरटीओशी संबंधित सेवांची माहिती देणे, वाहन चालवताना स्वत:सह वाहनांची काळजी कशी घ्यायची, वाहनांबाबत तांत्रिक ज्ञान, वाहनांशी संबंधित विविध कागदपत्रे, रस्त्यावरील नियम या पथकाच्या माध्यमातून सांगितले जाणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com