Nagpur : नागपूर पोलिसांची मोठी कारवाई; बनावट तंबाखू तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड

पोलिसांनी बनावट तंबाखू तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड टाकून १९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
nagpur crime news
nagpur crime news saam tv

Nagpur Crime News : नागपूरमधून मोठं वृत्त समोर आलं आहे. नागपूर ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी बनावट तंबाखू तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड टाकून १९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नागपूरच्या खापा पोलीस स्टेशन अंतर्गत करण्यात ही कारवाई करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

nagpur crime news
Pune Crime: सोशल मीडियाच्या माध्यमातून अंमली पदार्थांची विक्री; सिंहगड पोलिसांकडून दोघांना अटक

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमध्ये (Nagpur) बनावट तंबाखू तयार करणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत पोलिसांनी 18 लाख 93 हजार 225 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. नागपूरच्या खापा पोलीस स्टेशन अंतर्गत कारवाई करण्यात आली.

पेट्रोलिंग करीत असताना पाटण सावंगी परिसरात गुप्त माहिती बातमीदाराकडून खबर मिळाली. पोलीस स्टेशन खापा हद्दीतील मौजा वेलतूर शिवारातील शिवाजी रामचंद्र वाट यांच्या शेतातील घरात बनावट तंबाखू तयार करण्याचा कारखाना सुरू आहे, अशी खबर मिळाली. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभाग नागपूर यांच्याशी समन्वय साधून त्यांना सोबत घेऊन धाड टाकून कारवाई करण्यात आली.

nagpur crime news
नवापूर शहरात दोन गटात तुफान हाणामारी, तलवारीच्या साह्याने हल्ला; चार जण जखमी

या कारवाईदरम्यान सापडलेला मुद्देमाल व आरोपी हे पोलीस स्टेशन खापा यांच्या ताब्यात देण्यात आला. आरोपींविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाने विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. बनावट तंबाखू ही सुगंधी तंबाखूच्या रिकाम्या डब्ब्यात पॅक केली जात होती. हुक्का पार्लरसाठी लागणारी तंबाखू सुद्धा बनावट पद्धतीने तयार केली जात होती.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com