Nagpur : पैशांचा पाऊस पाडण्याच्या हव्यासापोटी वाघाच्या बछड्याची शिकार!

अवघ्या दहा दिवसांच्या वाघाच्या बछड्याची पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अंधश्रद्धेतून शिकार केल्याची धक्कादायक घटना नागपुरात उघडकीस आली आहे.
Nagpur : पैशांचा पाऊस पाडण्याच्या हव्यासापोटी वाघाच्या बछड्याची शिकार!
Nagpur : पैशांचा पाऊस पाडण्याच्या हव्यासापोटी वाघाच्या बछड्याची शिकार!File Photo

मंगेश मोहिते

नागपूर : अवघ्या दहा दिवसांच्या वाघाच्या बछड्याची पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अंधश्रद्धेतून शिकार केल्याची धक्कादायक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. बुट्टीबोरी वन परिक्षेत्राच्या हद्दीत या बछड्याच्या मृत अवयवांची विक्री करताना दोघे जण वनविभागाच्या हाती लागले. या प्रकरणातील मुख्य आरोपीचे नाव लोमेश दाबले असे असून दुसरा आरोपी कालिदास रायपूरे हा हा लोमेश याचा सहकारी आहे.

हे देखील पहा :

दोघेही चंद्रपूर जिल्ह्यातील असून त्यांच्याकडून मृत बछड्याचे अवयव जप्त करत पुढील तपास सुरू केला असता धक्कादायक प्रकार माहिती समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्याच्या चिंचबोडी गावातील असलेला लोमेश दाबले याचे जंगल परिसरात लागून शेत आहे. या शेतात वाघाच्या बछड्याची बळी देऊन पूजा कल्याने पाऊस पाडू शकतो असा आरोपींचा समज होता.

Nagpur : पैशांचा पाऊस पाडण्याच्या हव्यासापोटी वाघाच्या बछड्याची शिकार!
Alibag : अंमली पदार्थ प्राशन करून चोऱ्या करणारे तरुण जेरबंद!

यातुन मे महिन्यात या पूजेसाठी त्यांनी अवघ्या 10 दिवसाच्या वाघाचा बछड्याचा बळी दिला होता. पण शेतात पैशांचा पाऊस न पडल्याने अखेर मृत 10 दिवसाच्या बछड्याच्या शरीराच्या अवशेषांचे त्यांनी जतन केले. काही महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतर शांत राहून बछड्याच्या मृत शरीराचे अवशेष त्यांनी विक्रीस काढले. या गंभीर प्रकाराची चुणूक नागपूर वनविभागाला लागली. वनविभागाने अत्यंत सावधगिरीने सापळा रचला आणि आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.