Nagpur: मध्यरात्रीत पेट्रोल पंपावर तीन अज्ञातांकडून लुटमार
Nagpur: मध्यरात्रीत पेट्रोल पंपावर तीन अज्ञातांकडून लुटमारमंगेश मोहिते

Nagpur: मध्यरात्रीत पेट्रोल पंपावर तीन अज्ञातांकडून लुटमार

एकाच्या हातात कुर्हाड, एकाच्या हातात चाकू तर एक बिना शस्त्राने होते.

मंगेश मोहिते

नागपूर - उज्वल नगर Ujwal nagar चौकातील पेट्रोल पंप Petrol Pump वर काल रात्री 12 ते 1 वाजता च्या दरम्यान लुटपाट झाली. पंप वरील काही कर्मचारी आपले काम आटपून पैशाचा हिशोब करून करून 2 लाख 30 हजार रुपये ड्राव्हरमध्ये ठेवले आणि जेवण करायला बसले असताना तीन आरोपी तोंडावर कापड बांधून पोहचले. एकाच्या हातात कुर्हाड, एकाच्या हातात चाकू तर एक बिना शस्त्राने होते.

हे देखील पहा -

ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना शस्त्रचा धाक दाखवत त्यांना मारहाण केली . पैसे कुठे आहे हे विचारले आणि त्या ठिकाणी असलेले 2 लाख 30 हजार रुपये घेऊन फरार झाले. पोलीस आता या अज्ञात आरोपीचा शोध घेत आहे. नागपुरात गुन्हेगारी वाढत आहे. उज्वल नगर हा भाग गजबजलेला असतो साधारणतः रात्रीच्या वेळी सुद्धा या रोड वर रहदारी सुरू असते. अश्यात अश्या प्रकारच्या घटना, नागपुरात वाढलेली गुन्हेगारी आणि पोलिसांचा कमी झालेला वचक सांगण्यास पुरे आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com