
नागपूर - यंदाच्या उन्हाळ्यात नागपुरात चार स्टार बसेस जळाल्या. अचानक बसेस जळाल्याने प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचलाय. त्यामुळे आता नागपूर महानगरपालिका अनफीट बसेस का चालवतात? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. नागपुरात भंगारात जाण्याच्या स्थितीत असलेल्या, तब्बल १६७ बसेस सध्या नागपुरात (Nagpur) धावत असून, अनफीट बसेसमुळे प्रवाशांच्या जीवाला धोका आहे.
हे देखील पाहा -
नागपुरातील स्टार बस म्हणजेच ‘आपली बस’सेवेतील ३२ बसेसची योग्यता तपासणीच झाली नाही. तरीही या धोकादायक बसेसमधून नागपुरकरांचा प्रवास सुरू आहे. गेल्या दीड महिन्यात अशाच चार बसेसला आग लागली आहे. यासंदर्भात 10 वर्ष झालेल्या 167 बसेस अनफीट बसेस थांबविण्यात याव्या, असा ठराव घेण्यात आला होता. मात्र, तरीही मनपा प्रशासन प्रवाशांच्या जिवाशी खेळ करत आहेत” असा आरोप मनपाचे तत्कालीन परिवहन सभापती बंटी कुकडे यांनी केला आहे.
‘आपली बस’च्या ताफ्यात सध्या ४४७ बसेस आहेत. यापैकी ४१५ बसेसची RTO कडून योग्यता तपासणी झाली. मात्र, ३२ बसेस योग्यता तपासणीविना धावत आहेत. प्रादेशिक परिवहन विभागाने तीन दिवसांपूर्वीच महापालिकेच्या परिवहन विभागाला योग्यता तपासणी तातडीने करावी, यासाठी पत्र दिलेय. मात्र, मनपाला जाग आली नाही. भंगारात निघालेल्या बसेस रस्त्यावर धावत आहेत. त्यामुळं भविष्यात काही अघटीत घडण्यापूर्वी महापालिका आणि आरटीओ हे प्रकरण गांभीर्याने घेणार का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.