नालासोपारात भंगारवाल्यावर गोळीबार

नालासोपारात भंगारवाल्यावर गोळीबार
Crime News
Crime NewsSaam tv

नालासोपारा : नालासोपारा पूर्व पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वाकणपाडा परिसरात रिक्षातून प्रवास करत असलेल्या इसमावर दोन दुचाकीवर आलेल्या इसमांनी गोळीबार केला. यानंतर त्याच्या हातातील बॅग खेचून नेण्याचा प्रयत्न केला आहे. यात भंगारवाल्याच्या खांद्याला दोन गोळ्या (Crime News) असून तो जखमी झाला असून जीवाला कोणताही धोका नसून त्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (nalasopara crime news gun Shooting at Nalasopara aria)

Crime News
Dhule: आमदार मंजुळा गावित देखील नॉटरिचेबल

वालीव पोलिसांनी (Police) घटना स्थळाचा पंचनामा केला असून आरोपीचा शोध घेत आहेत. पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी सांगितले की, भंगाराच्या दुकानात काम करणारा अजयकुमार प्रजापती हा बॅग घेवून रिक्षातून प्रवास करत होता. या दरम्‍यान दुचाकीवर दोन जण आले आणि त्याच्या हातातील बॅग खेचून नेण्याचा प्रयत्न करत होते. या दरम्यान त्यांनी दोन गोळ्या झाडल्या.

सीसीटीव्‍हीमध्‍ये घटना कैद

सदरचा सर्व प्रकार सीसीटीव्‍ही (CCTV) कॅमेरामध्ये कैद झाला आहे. प्राथमिक अंदाजानुसार हा लुटपाटीचा प्रकार दिसत असून पोलीस अधिक तपास करत आहेत. लवकरच आरोपीला अटक केली जाईल असे त्यांनी सांगितले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com