चोरट्याने युट्यूबवरून घेतले टाळे तोडायचे धडे; केली १० लाखांची घरफोडी

नालासोपाऱ्यातील आचोळ्यात एकाने युट्यूबवरून घराचे टाळे कसे तोडायचे याचे धडे घेत १० लाखांची घरफोडी (Robbery) केली आहे.
चोरट्याने युट्यूबवरून घेतले टाळे तोडायचे धडे; केली १० लाखांची घरफोडी
Nalasopara Crime News Saam Tv

चेतन इंगळे

विरार : अनेकजण युट्यूबचा माहितीचा स्त्रोत्र म्हणून आधार घेतात.तर युट्यूब माध्यमाचा अनेकजण मनोरंजन, शैक्षणिक माहितीसाठी युट्यूबचा आधार घेतात. मात्र नालासोपाऱ्यातील आचोळ्यात एकाने युट्यूबवरून घराचे टाळे कसे तोडायचे याचे धडे घेत १० लाखांची घरफोडी (Robbery) केली आहे. या आरोपीला आचोळे पोलिसांनी उत्तर प्रदेशवरून (Uttar Pradesh) अटक केली आहे.

Nalasopara Crime News
जन्मदाते निघाले वैरी! सात महिन्यांच्या मुलीला भिकारी महिलेजवळ सोडून केले पलायन

मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपाऱ्यातील चोरट्याने युट्यूबवरून घराचे टाळे कसे तोडायचे याचे धडे घेवून १० लाखाची घरफोडी केली. त्याने नालासोपाऱ्यातील रश्मी रेसिडेन्सी या इमारतीत घरात घुसून १० लाखाचे दागिन्यांची चोरी केली. त्यामुळे चोरीच्या घटनेने नालासोपारा परिसरात खळबळ उडाली होती. त्यानंतर पीडित कुटुंबाने पोलिसात तक्रार दाखल केली. घरफोडी करून हा चोरटा फरार झाला होता. त्याचा शोध पोलिसांकडून सुरू होता. मात्र, आता फरार झालेल्या आरोपीला आचोळे पोलिसांनी उत्तर प्रदेशवरून अटक केली आहे. त्याच्याकडून ९ लाख ७५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Nalasopara Crime News
धावत्या कारमध्ये उभं राहून सेल्फी घेणं नवरदेवाच्या अंगलट, पोलिसांनी ठोठावला २ लाखांचा दंड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नालासोपारा आचोळे परिसरात राहणारा आरोपी दिलशान शेख (३८) याने युट्यूबवरून चोरीचे धडे घेतले. त्यानंतर परिसरात रश्मी रेसिडेन्सी या इमारतीत घरात घुसून १० लाखाचे दागिने आणि रोकड घेऊन लंपास झाला होता. घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून आरोपीचे वर्णन आणि पत्ता मिळवला. त्यानंतर आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी दोन पथके तयार केले. एक पथक गुजरात आणि दुसरे पथक उत्तर प्रदेश येथे रवाना करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी उत्तर प्रदेशमधून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपीने ही पहिलीच चोरी केली होती, अशी माहिती पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी दिली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com