नालासोपाऱ्यात नाल्यात सापडला व्यक्तीचा मृतदेह; हत्या की आत्महत्या याचा पोलिसांकडून तपास सुरू

नालासोपारा (Nalasopara) पूर्वेकडील नाल्यात एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
nalasopara crime news
nalasopara crime news saam tv

Nalasopara Crime news : नालासोपारा (Nalasopara) पूर्वेकडील नाल्यात एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सदर व्यक्तीची हत्या झाली की त्याने आत्महत्या केली ? याचा तपास तुळींज पोलीस करीत आहेत.

nalasopara crime news
पुणे हादरलं! गर्लफ्रेंडच्या मित्राने तिच्याच समोर केली जबर मारहाण; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा पूर्वेकडील देशमुख फर्मच्या लगत असलेल्या नाल्यात एका व्यक्तीचा मृतदेह तरंगताना पाहिला. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी तुळींज पोलीसांनी मृतदेहाजवळ एकच गर्दी केली. मृतदेहाजवळ जमा झालेल्या काही नागरिकांनी मृतदेहाबाबत पोलिसांना माहिती दिली. खबर मिळताच तुळींज पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

nalasopara crime news
पेंग्विन सेना म्हणणाऱ्यांना आम्ही चित्ता पार्टी म्हणायचं का? वरुण सरदेसाईंचा भाजपला टोला

पोलिसांनी अग्निशामक दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. सदर मृतदेह हा ४० वर्षीय देवेंद्र सिंग यांचा असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. सदर व्यक्तीची विरार पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार नोंद करण्यात आली होती. देवेंद्र सिंग हे सेल्समन होते, अशी प्राथमिक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यांच्याकडे एक पिशवी सापडली असून त्यात एक मोबाईल व कंपनीची कागदपत्रे सापडली आहेत. त्यांची हत्या की आत्महत्या याचा तपास तुळींज पोलीस करीत आहेत.

नालासोपाऱ्यात ATS च्या जाळ्यात अडकला नक्षलवादी, सापळा रचून केली अटक

नालासोपाऱ्यात एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ उडाली आहे. नालासोपाऱ्यातील धाणीव बागमध्ये लपून बसलेल्या एका नक्षलवाद्याच्या (Thane ATS) ठाणे दहशतवाद विरोधी पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. कारु हुशाला यादव (४५) असं अटक केलेल्या नक्षलवाद्याचं नाव आहे. यादव कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया सरकारने बंदी घातलेल्या माओवादी संघटेनेचा काम करत होता. नक्षलवादी यादववर १५ लाखांचा इनाम ठेवण्यात आला होता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com