
Chhatrapati Sambhajinagar Police Alert: पोलिसांना उशीर का झाला, अकोल्यातील दंगल पोलिसांनी घडवली का? असा सवाल करत कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उत्तर देण्याची मागणी केली आहे.
नाना पटोले म्हणाले, अकोल्यात झालेल्या दंगलीवेळी पोलीस उशिरा पोहचले, अकोल्यातील दंगल पोलिसांनी घडवली का? पोलिसांनी जमावाची समजूत का नाही काढली? देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत, त्याचबरोबर ते अकोल्याचे पालकमंत्रीही आहेत, त्यांनी या सर्व प्रश्नांची उत्तर द्यावी असेही ते म्हणाले.
संभाजीनगर पोलिसांकडून शहरात रेड अलर्ट
अकोल्यातील हिंसाचारानंतर अहमदनगरच्या शेवगावमध्येही दोन गटात हिंसाचार झाला. यापार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनंगर शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी अलर्ट जारी केला आहे. शहराच्या सुरक्षेसाठी आणि खबरदारीचा उपाय म्हणून एसआरपींच्या दोन तुकड्या शहरात तैनात करण्यात आल्या आहेत.
त्र्यंबकेश्वर मंदिरातील घटनेची SIT चौकशी होणार
जमावाने त्र्यंबकेश्वर मंदिरात बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी घडली होती. मंदिर प्रशासनाने वाद घालणाऱ्या जमावाला रोखलं होतं. पोलिसांच्या आणि मंदिर प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर तणाव निवळला. (Breaking News)
मात्र जमावावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पत्र पोलिसांना देण्यात आले आहे. कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ब्राह्मण महासंघाने दिला होता. या प्रकरणाची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली असून एसआयटी मार्फत या प्रकरणी चौकशी केली जाणार आहे. (Latest Political News)
अकोला हिंसाचारानंतर अमरावतीत अलर्ट
अकोला शनिवारी रात्री दोन गटांत झालेल्या हिंसाचारानंतर अमरावती पोलीस देखील अलर्ट झाले आहेत. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्या दोन जाणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे. (Latest Marathi News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.