
Nana Patole News : देवेंद्र फडणवीस यांची अवस्था डोळे बंद करून दूध पिणाऱ्या मांजरासारखी झाली आहे, असा खोचक टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्र्यांना लगावला आहे. फडणवीस यांनी केलेल्या नेत्यांच्या चौकशीच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले यांनी हा टोला लगावला.
नाना पटोले म्हणाले, मांजर दूध पिताना डोळे बंद करून असते, तिला वाटते मला कोणीच पाहत नाही. मांजरी सारखी डोळे बंद करून दूध पिण्याची अवस्था भाजपची झाली आहे आणि त्याचप्रमाणे आमचे मित्र फडणवीस बोलले आहे.
भाजपमध्ये गेलेले लोक कसे शुद्ध झाले आहे याची एक यादी आमच्या वरिष्ठ नेत्यांनी जाहीर केली आहे. मग त्यांनी सांगायला पाहिजे की जे भाजपमध्ये गेले त्यांच्यावरची कारवाई का थांबली, असेही नाना पटोले म्हणाले.
नॉर्थ ईस्ट निवडणूक झाली. तिथं फक्त भाजपला मोठा विजय मिळाला असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र तसं नाही. त्यांना तिथे जोडतोडची सरकार करावी लागली. खोटे बोला पण रेटून बोला अशी स्थिती भाजपची झाली आहे असे नाना पटोले म्हणाले. (Latest Marathi News)
राज्यात झालेल्या निवडणुकांचा अहवाल हाय कमांडला देण्यासाठी मी दिल्लीला दौरा केला अशी माहिती नाना पटोले यांनी दिली. तसेच कसब्यातील विजयाबाबत बोलताना काँग्रेस पक्ष हा जनतेचा पक्ष आहे आणि काँग्रेस पक्षासोबत जनता आहे. हे बीजेपी स्वतः सांगत असेल तर या वाक्याचा आम्ही स्वागत करतो. बीजेपी हा मूठभर उद्योगपत्यांचा पक्ष आहे, असेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्या सभेबाबत बोलताना ते म्हणाले, चिन्ह बदल हा आमच्यासाठी नवीन नाही. आमचे चिन्ह सुद्धा अनेक वेळा बदलले. जनतेचा विश्वास हा महत्त्वाचा असतो. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. लोकशाहीचा खून केला जात असेल एखाद्या पक्षाला एका रात्रीत संपवून दुसऱ्याच्या ताब्यात द्यायचं असं चित्र तयार होत असेल तर ते भय्यावाह आहे, असे पटोले म्हणाले. (Latest Political News)
ते म्हणाले काही दिवसापूर्वीचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय बघितला तर तो फार बोलका आहे. त्यातून त्यांनी (भाजपने) समज घ्यायला पाहिजे. सत्तेमध्ये बसलेल्या भाजपच्या लोकांना ते कळत नसेल तर दुर्भाग्य आहे, असे ते म्हणाले.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.