...म्हणून भुजबळांच्या प्राॅपर्टी भाजपने जप्त केल्या : पटाेले

...म्हणून भुजबळांच्या प्राॅपर्टी भाजपने जप्त केल्या : पटाेले
nana patole

सातारा : मागासवर्गीय व्यक्तीने दिल्लीमध्ये सुंदर इमारत बांधली आहे. मात्र भाजपला ओबीसींचा राग आहे. त्या रागाच्या भरात भुजबळ यांना बदनाम करून त्यांच्या सर्व प्रॉपर्टी जप्त करण्यात आल्या आहेत. या पद्धतीचा त्रास देण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचे समोर आले आहे असे काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले nana patole यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने वडूज येथे आयाेजिलेल्या व्यर्थ न हो बलिदान,हुतात्मा अभिवादन आणि स्वातंत्र्य सैनिक सत्कार या कार्यक्रमात काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले उपस्थित हाेते. त्यानंतर साम टीव्हीशी बाेलताना त्यांनी केंद्र सरकाराच्या कारभारावर ताशेरे आेढले. त्यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे एच.के.पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित हाेते.

ईडी आणि सीबीआय कश्याप्रकारे पोपट झाले आहेत हे देशातील लोकांना कळले आहे. हे भुजबळ यांना मिळालेल्या क्लीन चिटमुळे समजले आहे. भाजपमध्ये आला तर तो शुद्ध होतो आणि विरोधात असतो तो अपवित्र असतो अशी वागणूक भाजपची आहे असा टाेला नाना पटोले यांनी लगावला. जस इंग्रज देश लुटायच काम करत होते तसे काम केंद्रात बसलेली लोक करत आहेत. इंग्रजांपेक्षा भयानक परिस्थिती केंद्र सरकारने निर्माण केली आहे असे पटोलेंनी नमूद केले.

nana patole
काळजी घ्या! बाप्पाच्या उत्सवानंतर ७ जिल्ह्यात काेविडचे विघ्न

ईडी सारख्या संस्था बनल्या घरगड्या

दरम्यान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मी काही वर्षे सीबीआयचा प्रमुख होतो. मात्र सध्या घरगड्यासारखे संस्थांना बाळगावायच चालू आहे म्हणेल ते दोषी म्हणेल ते निर्दोष, ईडीने काहींना पाच पाच नोटिसा दिल्या आहेत मात्र त्याला कोण दाद देत नाही. इतकी केविलवाणी परिस्थिती सध्या झाली असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केले. दरम्यान या वेळी भारतीय काॅंग्रेसचे प्रभारी एच.के.पाटील यांनी केंद्र सरकारवर टीका करीत 'वडूजच्या भूमीतून क्रांती करून पुन्हा नवा इतिहास घडवूया' असे आवाहन केले.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com