काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संस्कृतीत फरक : नाना पटोले
Nana Patole SaamTv

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संस्कृतीत फरक : नाना पटोले

जावेद अख्तर यांच्या "संघ आणि तालिबान" वक्तव्याशी सहमती दर्शवत देशापेक्षा एखादी संघटना स्वतःला मोठे मानत असेल तर जावेद हे काहीच चुकीचे बोलले नाहीत असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

गोंदिया : पुणे जिल्ह्यातील कदमाकवस्ती येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने महिला सरपंचाला केलेल्या मारहाणीवर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीला चांगलाच चिमटा काढला असून महिला सरपंचाला मारहाण करणे निषेधार्ह बाब असून अश्या प्रवृत्तीचे मी समर्थन करत नाही, तसेच हीच राष्ट्रवादीची संस्कृती आहे का? असा टोला देखील लगावला आहे. काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या संस्कृतीत फरक असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे पटोले यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील मतभेद पुन्हा एका समोर आले आहेत.

हे देखील पहा :

जावेद अख्तर यांचे म्हणजे बरोबर, देशाच्या अहिताचा विचार करणारे संघटन तालिबान सारखेच

जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यांना समर्थन करणारे लोक देखील तालिबानी मानसिकतेचेच असल्याचे वक्तव्य केले होते. यावर बोलताना पटोले म्हणाले कि, अख्तर यांनी RSS ची तालिबानशी केलेली तुलना कोणत्याही प्रकारे चुकीची नसल्याचे म्हटले आहे. आरआरएस चे प्रचारक देशाचे पंतप्रधान झाले आहेत. त्यांनी देशाला विकण्याचे उद्योग चालले आहेत. त्यामुळे, देशापेक्षा जर कोणती संघटना स्वतःला मोठी समजत असेल तर जावेद अख्तर यांचे म्हणणे काहीही गैर नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Nana Patole
Breaking Beed : करुणा मुंडेंच्या गाडीत आढळली पिस्तूल! पोलिसांनी घेतले ताब्यात

OBC समाजाला आरक्षण मिळाल्यावरच निवडणुका व्हाव्या यावर कांग्रेस ठाम

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुढे करून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ठेवून त्यावर प्रशासक नेमणे हा सरकारचा उद्योगधंदा सुरु असल्याच्या आरोप राज ठाकरे यांनी होता. यावर प्रतिक्रिया देताना पटोले म्हणाले, हे राज ठाकरेंचे वैयक्तिक मत असून त्यात तथ्य नसल्याचे म्हटले आहे. ओबीसी समाजाला आरक्षण मिळाल्यावरच निवडणुका व्हाव्यात यावर कांग्रेस ठाम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी राज्यपाल हे भाजप कार्यकर्ते असून राजभवन भाजपा कार्यालय झाले असल्याची टीका देखील त्यांनी राज्यपालांवर १२ आमदारांच्या नियुक्तीवरून केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com