स्वबळाच्या नाऱ्यावर नाना पटोले ठाम

2024 मध्ये राहुल गाधींच्या नेतृत्वातच निवडणूक लढवली जाईल
स्वबळाच्या नाऱ्यावर नाना पटोले ठाम
स्वबळाच्या नाऱ्यावर नाना पटोले ठामsaam tv

सुमित सावंत

राज्यातील इंधनदरवाढी विरोधात कॉँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या नेतृत्त्वात कॉंग्रेस नेते हॅगींग गार्डन ते राजभवनापर्यंत सायकल रॅली काढणार आहेत. उद्या दुपारी 12 वाजता सायकल रॅलीनंतर ते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेणार आहेत. अशी माहीती नाना पटोले यांनी मध्यामांशी बोलताना दिली आहे. नाना पटोले यांनी दोन दिवसांपूर्वी स्वबळाचा नारा दिला. त्यांनंतर राज्यात बराच वादंग झालेला पाहायला मिळाला. त्यानंतर आज नाना पटोले यांनी राज्यातील राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या घडामोडींवरदेखील भाष्य केले आहे. (Nana Patole insisted on the slogan of self-reliance)

स्वबळाच्या नाऱ्यावर नाना पटोले ठाम
धुळे तालुक्यातील जापी परिसरात तरुणाचा खून

सामनानं चांगलं लिहीलंय. कॉंग्रेसच्या हिताचंच सांगितलंय. 2024 मध्ये राहुल गाधींच्या नेतृत्वातच निवडणूक लढवली जाईल. नानांनी कॉंग्रेसला महाराष्ट्रात उभारी दिली, अशा शब्दांत सामनात प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखावर नाना पटोले यांनी आपले मत व्यक्त केले आहे. तसेच, मंत्री बदलाबाबत हायकमांड जे निर्णय घेतील ते ठरल्यावर तुमच्या पर्यंत येईल, सध्या आमच्याकडे अशी कोणतीही चर्चा नाही, असेही नाना पटोले यांनी सांगितले. स्वबळाच्या नाऱ्याबाबात त्यांनी आपली भुमिका स्पष्ट केली आहे. हायकमांडने मला पक्ष मजबुत करण्याची जबाबदारी दिली ती मी पार पाडणार आहे. मी काही शिवसेना- राष्ट्रवादीविरोधात अॅटेक करत नाही. भाजप विरोधात करतो. २०१४ मध्ये झाला तसा धोका होऊ नये म्हणून स्वबळाची तयारी करतो आहोत. जर आता आम्ही सोबत आहोत असं म्हटलं आणि ऐन निवडणुकांच्या वेळी स्वतंत्र लढण्याची घोषणा केली तर ते योग्य ठरणार नाही, असंही नाना पटोले यांनी सांगितले आहे.

तसेच, ओबीसींचं राजकीय आरक्षण मुद्द्यावर कॉंग्रेस आंदोलन उभं करणार आहे. याच संदर्भात आमचे नेते काल शरद पवारांना भेटले. या भेटीचं मला पवारांचं आमंत्रण नव्हतं. त्यामुळे मी गेलो नाही, असंही नाना पटोले यांनी म्हटले. दरम्यान गेल्या काही वर्षांतील कॉंग्रेसच्या कामगिरीबाबात जनतेच्या भुमिका पाहता, कॉंग्रेस मरणासन्न अवस्थेत अजिबातच नाही. संजीवनी नेत्यांकडे नाही जनतेकडे असते, असेही पटोले यांनी म्हटले आहे.

तर एकनाथ खडसे यांच्यावर झालेल्या जमीन घोटाळ्याच्या आरोप प्रकरणी भाजप सरकारच्या काळात नेमलेल्या झोटिंग समितीचा अहवाल प्रकरणी देखील नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ''देवेंद्र फडणविसांनी बहुजन समाजाच्या नेत्यांचं खच्चीकरण केलं. खडसेंचंही याच कारणामुळे खच्चीकरण केलं. एखाद्या गोष्टीचा फार्स तयार करुन त्यात लोकांना गुंतवायचं हे फडणविसांना चांगलं जमतं. झोटींग समितीचा अहवाल देखिल फार्सच आहे,'' असं नाना पटोले यांनी म्हंटल आहे.

Edited By- Anuradha

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com